चक्क 'इतक्या' शेतकऱ्यांच्या खात्यांना आधार लिंकची अडचण 

aadhaar.jpg
aadhaar.jpg

नाशिक : कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 40 हजारांवर शेतकऱ्यांचे आधार कर्ज खात्याशी लिंक करावे लागणार असून, यात जिल्हा बॅंकेच्या 27 हजार खातेदारांचा समावेश आहे. आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मंगळवारी (ता.7) गावपातळीवर प्रसिद्ध होणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात म्हणून महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधारशी लिंकिंग करणे बंधनकारक आहे. नाशिकला साधारण दोन लाखांपैकी 20 टक्के म्हणजे 40 हजारांवर शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार लिंकिंग केले नसल्याचे समोर आले आहे.

गावपातळीवर याद्या तपासून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

आधार लिंक नसलेल्यांत जिल्हा बॅंकेच्या एक लाख 20 कर्ज खातेदारांपैकी 27 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी गावांमध्ये व बॅंकांमध्ये याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ज्यांचे आधार नाहीत, त्यांनी "आपले सरकार' सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करून घ्यावी. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया बॅंकांमार्फत राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी बॅंकांमध्ये जाऊन कर्ज खात्याशी आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आधार कर्ज खात्याशी लिंक करावे लागेल. 

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत आधार लिंकिंग नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मंगळवारी प्रसिद्ध केल्या जातील. जिल्ह्यातील दोन लाखांपैकी 20 टक्के शेतकऱ्यांचे आधार कर्ज खात्याशी लिंक करावे लागेल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत आधारकार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना आधार केंद्रावर प्राधान्याने कार्ड काढून देण्याचे निर्देश दिले आहेत. कुणाला काहीही अडचण असल्यास संबंधित शासकीय यंत्रणेशी अथवा महसूल आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. - दिलीप स्वामी, महसूल उपायुक्त, नाशिक विभाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com