ना नुकसानभरपाई, ना पिकविमा! सायगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच 

Farmers affected by the rains have not received compensation nashik marathi news
Farmers affected by the rains have not received compensation nashik marathi news

सायगाव (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील सायगाव परिसरातील गावांत यंदा जास्त पावसाने खरीपाच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च त्यात भावही नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. शासकीय पातळीवरही ना मदत, ना पिकविमा मिळाल्याने मोठा खर्च करूनही कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने अस्वस्थतता पसरली आहे. 

शेतकरी परिस्थीती बिकट

रब्बी हंगामातही सततच्या ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रार्दुभाव होत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने संकटात भर पडली आहे. यंदाच्या खरीपात कधी झाले नाही इतके नुकसान मूग, बाजरी, भुईमुग, मका, कपाशी, कांदा यासह सर्वच पिकांचे झाले आहे. मूग अक्षरश: सडल्याने निम्माही भाव मिळाला नाही. बाजरीचे उत्पादन घटून चारा खराब झाला. बाजरीचे दाणेही खराब झाल्याने या बाजरीला बाजारात क्विंटलला हजार रुपये दर अवघड झाले आहेत. मकाचे उत्पादनही निम्म्यावर आले आहे. कपाशीचे तर सर्वात जास्त नुकसान झाले असून पंचवीस टक्केच उत्पादन हातात आले. कांदा पिकांची स्थितीही वाईट झाली आहे. अशा स्थितीत नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करून मदत मिळणे गरजेचे असताना फक्त कांदा पिकांचे पंचनामे झाले. ती तोडकी मदत आता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे. इतर कोणत्याच पिकाला ना नुकसान भरपाई मिळाली, ना पिक विमा यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहेत. 
 

शेतीत पिकांसाठी फक्त खर्च झाला. हातात कवडीही शिल्लक राहिली नाही. शासन स्तरावरुन मदत, पिकविमा मिळेल अपेक्षित होते. पण काहीच मदत मिळाली नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 
- सुनिल देशमुख, शेतकरी, सायगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com