ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल; कांदा पिक, द्राक्षबागाही धोक्यात 

Farmers are worried due to cloudy weather nashik marathi news
Farmers are worried due to cloudy weather nashik marathi news

लासलगाव (जि. नाशिक) : परिसरात सोमवारी (ता.४) मध्यरात्री रात्री झालेला बिगरमोसमी पाऊस आणि तीन दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी हबकला आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे कांद्यासह काढणीला आलेल्या रब्बी पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. 

खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी धडपड करीत आहे. ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांनाही मोठा फटका बसत आहे. कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाते. पण, ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर खोडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कांदा जगविण्यासाठी महागडी कीटकनाशके, बुरशीनाशक व पोषक औषधांसाठी चार ते पाच हजारांचा खर्च वाढला आहे. कांदा लागवडीपासून ते आतापर्यंत २५ ते ३० हजारांचा खर्च झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे औषध व रासायनिक खतांचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. 

गतवर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. आता रब्बी हंगामही या ढगाळ वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कांद्यासह रब्बी पिकांना गुलाबी थंडीची नितांत आवश्‍यकता असतानाच गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. 
- सुनील गवळी, कांदा उत्पादक शेतकरी, ब्राह्मणगाव (विंचूर)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com