निफाड तालुक्यातील शेतकऱ्याची विषारी औषध घेत आत्महत्या; परिसरात खळबळ

माणिक देसाई
Thursday, 22 October 2020

कोरोना संकट, अवकाळी पाऊस, वादळ यांमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आलेला आहे. कोरोना, पिक नासाडी, कर्जमाफी अद्याप झालेली नाही, त्यामुळे नवीन कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी या सगळ्यातून शेतकऱ्यांनी आपला जीव गमावलेला आहे.

नाशिक : दिंडोरी तास (ता.निफाड) येथील युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास शेतात पडलेला मृतदेह बघून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

द्राक्षेबागेचे ओषध घेत संपविली जीवनयात्रा

दिंडोरी तास येथील युवा शेतकरी शांताराम दिनकर तासकर (वय ३५) याने गुरुवारी (ता. 22) रोजी सकाळी द्राक्षेबागेचे ओषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी शांताराम तासकरचा मृतदेह शेतात आढळुन आल्याने कुटुंबातील व्यक्तीने निफाड पोलीसाना माहिती दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या आत्महत्येने दिंडोरी तास परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काटकर पुढील तपास करीत आहे. कोरोना संकट, अवकाळी पाऊस, वादळ यांमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आलेला आहे. कोरोना, पिक नासाडी, कर्जमाफी अद्याप झालेली नाही, त्यामुळे नवीन कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी या सगळ्यातून शेतकऱ्यांनी आपला जीव गमावलेला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश 

राज्यात तब्बल 1198 शेतकऱ्यांनी आत्महत्या

मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, नापिकी, हमीभाव नावी, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा आणि कोरोनाचा फटका यांमुळे लॉकडाऊनदरम्यान मार्च ते मे 2020 या कालावधीत राज्यात तब्बल 1198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दैनिक सकाळने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत 666 शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण जवळपास दुप्पट झालं आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers commit suicide in Niphad taluka nashik marathi news