''शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला एका दिवसात समोर उभा करु'' - ASP चंद्रकांत खांडवी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

शेतकऱ्यांनी जर नवीन व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना पोलिसांशी संपर्क करून चौकशी केली तर व्यापारी जिल्ह्यातील असल्यास त्याची माहिती आम्ही एक तासात व इतर राज्यातील असल्यास त्यांची एक दिवसात शेतकऱ्यांना देऊ शकतो असे ही त्यांनी सांगितले.

नाशिक : शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूकीचे प्रमाण वाढतच आहे. तालुक्यासह जिल्हाभरात बऱ्याच फसवणूकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र घाबरुन शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. 'शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्यास, न घाबरता पोलिसांत तक्रार करावी. योग्य न्याय नक्की मिळेल'. असे आश्वासन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिले.

पोलिस कुटुंबाशी संवाद

आपला पदभार स्वीकारल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हे सटाणा येथे आले होते. पोलिस स्टेशन व कर्मचारी राहत असलेल्या वसाहतीला त्यांनी भेट दिली. वसाहतीत सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व पत्रकार यांच्याशी संवाद साधला. खांडवी यांनी पोलिस वसाहतीच्या बांधकामाची पाहणी केली. ठेकेदारालाही काही सूचना केल्या. वसाहतीतील काही पोलिस कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. 

व्यापाऱ्यांना कठोर शासन करण्यात येईल...

खांडवी म्हणाले, शेतकरी फसवणूक प्रकरणाची चौकशी करून व्यापाऱ्यांना कठोर शासन करण्यात येईल. आतापर्यंत सटाणा पोलिस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या फसवुणुकीचे १० गुन्हे दाखल झाले असून, चार गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी जर नवीन व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना पोलिसांशी संपर्क करून चौकशी केली तर व्यापारी जिल्ह्यातील असल्यास त्याची माहिती आम्ही एक तासात व इतर राज्यातील असल्यास त्यांची एक दिवसात शेतकऱ्यांना देऊ शकतो असे ही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

यावेळी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सहाय्यक निरीक्षक किरण पाटील, विजय वाघ, रवी भामरे, गोपनीय शाखेचे योगेश गुंजाळ, अशोक चौरे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers, don't be afraid to complain, ASP chandrakant khandvi nashik marathi news