कांदा दर निश्चितीसाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी - भारत दिघोळे

अजित देसाई
Saturday, 24 October 2020

रोप तयार करण्यापासून ते विक्रीपर्यंत कांद्याला किलोमागे सरासरी 20 खर्च येतो. परंतु हवे तसे बाजारभाव मिळत नाही. याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा दर निश्चितीसाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. ​

नाशिक : (सिन्नर) आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले.

राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या मेळाव्यात आवाहन

तालुक्यातील खडांगळी येथे संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. यावेळी माजी उपसरपंच केशव कोकाटे, युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खुळे, रंगनाथ कोकाटे, सुनील ठोक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दिघोळे यांनी शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत येत असलेल्या समस्या व त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची असेल त्यांनी आता बियाणे स्वतःच्या घरी तयार केले पाहिजे. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

बोगस बियाणे खरेदी

अनेक शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झाली असून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात सुनील बारकू ठोक यांची राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानिमित्त दिघोळे यांच्या हस्ते ठोक यांचा सत्कार करण्यात आला. कैलास ठोक, राजेंद्र कोकाटे, गिरीश ठोक, गोरख कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, बाबुराव ठोक, गोपाळ ठोक, गणेश कोकाटे, दीपक खुळे, गणेश ठोक, योगेश ठोक, सोमनाथ कोकाटे, सुरेश खुळे, संजय खुळे, केशव भोकनळ, ज्ञानेश्वर भोकनळ आदींसह परिसरातील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers need unity to fix onion rates nashik marathi news