दुष्काळी तालुक्यांवर पावसाची मेहरबानी...हिरमुसलेली पिके बहरली...कुठे ते वाचा 

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

अनेक भागात रिमझिम, तर काही भागात मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी त्या तुलनेत जुलैत पाऊस रुसलेला दिसतो. जुलैच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४८ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे दुष्काळी मालेगाव, सिन्नर तालुके वार्षिक सरासरीच्या शंभरीजवळ पोचले आहेत. 

नाशिक/ येवला : गुरुवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने दोन आठवड्यांचा खंड पडल्यामुळे हिरमुसलेली पिके पुन्हा बहरली आहेत. अनेक भागात रिमझिम, तर काही भागात मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी त्या तुलनेत जुलैत पाऊस रुसलेला दिसतो. जुलैच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४८ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे दुष्काळी मालेगाव, सिन्नर तालुके वार्षिक सरासरीच्या शंभरीजवळ पोचले आहेत. 

खरिपाला जीवदान 

या वर्षी जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पाऊस पडला. विशेष म्हणजे जूनची जिल्ह्याची सरासरी १७४ मिलिमीटर असून, महिन्यात तब्बल २४६ मिलिमीटर म्हणजे १३६ टक्के पाऊस पडला परंतु जुलै महिना सुरू होताच पाऊस काहीसा कमी झाला. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने पिके करपू लागली होती. यातच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावत खरिपाला जीवदान दिले आहे. 

२४ तासांत ३६९ मिलिमीटर 

शुक्रवारी (ता. २४) सकाळी २४ तासांत जिल्ह्यात ३६९ मिलिमीटर पाऊस पडला असून, जुलैच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत निम्माच पाऊस (४८.५३) पडला पडला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८२ मिलिमीटर पाऊस होता. मात्र आजपर्यंत आकडा ४१० मिलिमीटरवर (४१ टक्के) पोचला आहे. 

★ पाऊस बोलतो...(आकडे ता.२४ पर्यतचे । मिमीमध्ये )

तालुका - वार्षिक पर्जन्यमान - जुलैमधील – एकूण - वार्षिक टक्केवारी
नाशिक  - ६९५ - ६८ - ३२१ - ४६.२५
इगतपुरी  - ३०५८ - ७०४ - १३८८ - ४५.३९
दिंडोरी  - ६७९ - ३७ - १७४ - २५.६२
पेठ    - २०४३ - २११ - ३६७ - ३६७ - १७.९८
त्रंबकेश्वर - २१६६ - २१२ - ४६२- २१.३३
मालेगाव - ४५७ - १७८ - ४५२ - ९८.७७
नांदगाव - ४९१ - २१३ - ३८४ - ७८.१६
चांदवड - ५२९ - ११२ - २१३ - ४०.२३
कळवण - ६३९ - ६९ -  २३१ - ३६.१२
बागलाण - ४८८ - १३४ - ४५२ - ९२.५९
सुरगाणा - १८९५ - १९३ - ३९६ - २०.८९
देवळा  - ४२२ - ८५ - ३१५ - ७४.५९
निफाड - ४६२ - ४९ - १९० - ४१.२५
सिन्नर  - ५२२ - १०० - ४८१ - ९२.०८
येवला  - ४५३ - ९७ - ३३२ - ७३.१९
जिल्हा सरासरी -  १०७५ - १६४ - ४१० - ४१.०५

 हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

पेठला फक्त १८ टक्के 

गेल्या ५४ दिवसांत सर्वाधिक पाऊस दुष्काळी तालुक्यात पडला, तर पावसाच्या माहेरघरी मात्र अद्याप अवकृपा आहे. पेठमध्ये केवळ १८ टक्के, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २१ टक्केच पाऊस असून, दुष्काळी मालेगाव तर वार्षिक सरासरीच्या शंभरी जवळ पोचले आहे. मालेगाव खालोखाल बागलाण व सिन्नर ९२ टक्क्यांवर, तर नांदगाव ७८ आणि येवला ७३ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. 

 हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers were happy as there was soothing rain in two days in the drought affected talukas nashik marathi news