त्या कैद्याचा अचानक मृत्यू...अन् कारागृहात माजली खळबळ! कैद्यांत भीतीचे वातावरण

jail 123.jpg
jail 123.jpg

नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील कैदीचे निधन झाले. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर समजणार आहे. मात्र, त्याच्या मृत्यूने जेलच्या कर्मचाऱ्यांसह शाळेत ठेवलेल्या कारागृहातील 300 कच्चा कैद्यांत भीतीचे वातावरण आहे.

कैद्याच्या मृत्यूने कारागृहात भीती 

नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदी बाळू गिरीधर जाधव (वय 46, मूळ रा. भिवंडी) याचे आज जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर समजणार आहे. मात्र, कोरोनाच्या साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्या मृत्यूने जेलच्या कर्मचाऱ्यांसह के. एन. केला शाळेत ठेवलेल्या कारागृहातील 300 कच्चा कैद्यांत भीतीचे वातावरण आहे. मृत जाधव याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. 6 जुलैला त्याची प्रकृती खालावली. कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. दयानंद कांबळे यांनी त्याच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान त्याचे आज निधन झाले. मृत जाधव याच्या विरोधात पत्नीच्या छळाच्या आरोपावरून सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 3 जुलै 2020 ला त्याला अटक झाली. निफाड दिवाणी न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली होती. 4 जुलैला तो नाशिक रोड कारागृहाच्या के. एन. शाळेतील कारागृहात दाखल झाला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com