VIDEO : अखेर १७४ दिवसांनी दिमाखात निघाली "मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस"! प्रवाशांसाठी 'या' आहेत सुचना

manmad panchavti.jpg
manmad panchavti.jpg

नाशिक / मनमाड : नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड-मुंबई पंचवटी कोविड स्पेशल एक्स्प्रेस लॉकडाऊन नंतर तब्बल १७४ दिवसांनी आजपासून प्रवाश्यांच्या सेवेत सुरू झाल्याने नाशिक-मुंबई प्रवाश्यांची चांगली सोय झाली आहे आज (ता.१२) पहिलाच दिवस असल्याने सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी तब्बल १७४ दिवसांनी हॉर्न वाजवत पंचवटी एक्सप्रेस मुंबई कडे रवाना झाली

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी

रेल्वे सेवा नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करत असलेल्या हजारो प्रवाशांसाठी आज आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरातील रेल्वे वाहतूक बंद आहे. मात्र आता मध्य रेल्वेने आजपासून मनमाड ते मुंबई दरम्यान पंचवटी ही विशेष रेल्वे म्हणून सुरू केली आहे. मात्र प्रवाशांना प्रवास करताना तिकीटा ऐवजी आरक्षण करावे लागणार आहे. हीच गाडी विशेष रेल्वे म्हणून दररोज ठरलेल्या वेळेत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाडकर चाकरमान्यांना ही आनंदाची बातमी असली तरी या गाडीचे काऊंटरला तिकीट मिळणार नसून त्यासाठी अगोदर आरक्षण करावे लागणार आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव करणाऱ्या सर्व उपाय योजना

तिकिट आरक्षण करून या गाडीने प्रवास करता येणार आहे दोन दिवस अगोदरच  आरक्षण करावे लागणार आहे .१५३४ आसनांची क्षमता असलेल्या या विशेष गाडीत आज पहिल्याच दिवशी सर्वसाधारण बोगीतून ३२० तर वातानुकूलित बोगीतून ८ प्रवाश्यांनी प्रवास केला. कोरोना संसर्गापासून बचाव करणारे सर्व उपाय योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशी आनंदित आहे. मात्र मनमाड- नाशिक व नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठीही विशेष गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.

तब्बल १७४ दिवसांनी हॉर्न वाजवत मुंबईकडे रवाना

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या विशेष फेऱ्या सुरू होत्या. अन्य प्रवाश्यांना आजही रेल्वेचे दरवाजे बंदच होती. त्यामुळे मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी येथून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरी कंपन्या व कार्यालये सुरू झाल्याने नियमावली निश्चित करून रेल्वेसेवा पूर्ववत करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरत होती. या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेकडून काहीशी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पंचवटी एक्सप्रेस सुरू झाली असली तरी त्यात तिकीट व्यवस्था नाही मासिक पास नाही त्यामुळे चाकरमान्यांची कुचंबणा झाली आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याचा विचार करून चाकरमान्यांच्या सोयीसाठी तिकीट अथवा पास व्यवस्था करण्याची मागणी चाकरमान्यांनी केली आहे.

संपादन - ज्योती देवरे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com