तडजोडीसह साक्षीदार फितूर.. तरीही न्यायालयाकडून आरोपींना दणका..! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

खटल्याचे कामकाज सुरु असतानाच फिर्यादी व साक्षीदारांनी न्यायालयाबाहेर तडजोड केली. साक्षीदार फितुर झाले असताना सरकार पक्षाकडून वकिलाने मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तो युक्तीवाद ग्राह्य धरत दिलेल्या निकालाने आरोपींनाही चांगलाच दणका बसला आहे. मालेगाव तालुक्‍यातील वडनेर खाकुर्डी येथे सुमारे तीन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता. नेमके काय आहे प्रकरण एकदा वाचाच... 

नाशिक / मालेगाव : खटल्याचे कामकाज सुरु असतानाच फिर्यादी व साक्षीदारांनी न्यायालयाबाहेर तडजोड केली. साक्षीदार फितुर झाले असताना सरकार पक्षाकडून वकिलाने मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तो युक्तीवाद ग्राह्य धरत दिलेल्या निकालाने आरोपींनाही चांगलाच दणका बसला आहे. मालेगाव तालुक्‍यातील वडनेर खाकुर्डी येथे सुमारे तीन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता. नेमके काय आहे प्रकरण एकदा वाचाच... 

काय होते प्रकरण?
या खटल्याची माहिती अशी, मोरे ज्वेलर्सचे मालक उमेश मोरे हे दुकान बंद करुन मालेगावी येत असताना 21 जानेवारी 2017 ला सायंकाळी सातच्या सुमारास सुनील वाघ व अमोल जाधव यांच्या कारने मोरे यांच्या दुचाकीला वडनेर शिवारात धडक दिली. अपघातात ते खाली पडून जखमी झाले. ही संधी साधून संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून दोन लाख 35 हजाराचे दागिने लुटले. रस्त्याने जाणाऱ्या काहींनी कारचा पाठलाग करुन एका संशयिताला अटक केली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे व सहकाऱ्यांनी तपास केल्यानंतर लुट व सोने विक्रीचा कट असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

पाच वर्षे सक्तमजुरी 
वडनेर खाकुर्डी येथील मोरे बंधु ऍन्ड ज्वेलर्सचे मालक उमेश मोरे (रा. मालेगाव) दुकान बंद करुन मालेगावी परतताना त्यांच्या दुचाकीला कारची धडक देत मिरची पुड टाकून दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोने लुटल्याच्या आरोपावरुन सुनील वाघ (रा. शिपाई कॉलनी, सोयगाव) व अमोल जाधव (रा. पंचवटी नाशिक) या दोघांना पाच वर्षे सक्त मजुरी व पंचवीस हजार रुपये दंड न्यायालयाकडून सुनावण्यात आला. या गुन्ह्यातील अन्य चौघा संशयितांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अपर जिल्हा सत्र न्यायाधिश अनिरुध्द गांधी यांनी हा निकाल दिला. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

चार संशयित निर्दोष मुक्त 
या गुन्ह्यात दोघा प्रमुख आरोपींसह निलेश राऊत, प्रशांत सरदेसाई, अभय वाघ, अमोल राजधर (सर्व रा. नाशिक) यांच्याविरुध्द वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात रस्ता लुट, कट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लुटीचे सोने सुनील व अमोल यांच्या ताब्यात मिळून आले. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश गांधी यांच्या समोर चालले. खटल्याचे कामकाज सुरु असताना फिर्यादी व साक्षीदारांनी न्यायालयाबाहेर तडजोड केली. साक्षीदार फितुर झाले असताना सरकार पक्षातर्फे ऍड. संजय सोनवणे यांनी कामकाज करताना रस्ता लुट व दरोड्यात लुटलेले सोने दोघा मुख्य आरोपींकडून मिळून आल्याने गुन्हा सिध्द झाल्याचा युक्तीवाद केला. युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश गांधी यांनी दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्याच्या कामकाजात हवालदार किशोर दळवी यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five years prison nashik malegaon marathi news