"आम्ही गावाला गेलो अन् घरी येऊन बघतो तर 'असे' घडले!" घटनेने परिसरात भितीचे वातावरण

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 14 September 2020

 "आम्ही गावाला गेलो असल्यामुळे बंद घराचे कुलूप होते. पण त्यावेळी अज्ञातांनी संधी साधून असे काही केले. ज्यामुळे कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तर दुसऱ्या घटनेत शनिवारी रात्री घरच्या पहिल्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता. आत पाहिले तरी पुन्हा तोच प्रकार घडला होता.

नाशिक / सिडको : "आम्ही गावाला गेलो असल्यामुळे बंद घराचे कुलूप होते. पण त्यावेळी अज्ञातांनी संधी साधून असे काही केले. ज्यामुळे कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तर दुसऱ्या घटनेत शनिवारी रात्री घरच्या पहिल्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता. आत पाहिले तरी पुन्हा तोच प्रकार घडला होता. काय घडले वाचा सविस्तर

असा घडला प्रकार

संतोष जोशी (रा. खोडे मळा, जुने सिडको) यांनी अंबड पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीनुसार, आम्ही गावाला गेलो असल्यामुळे बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरातील दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे साडेसात तोळ्याची चैन, मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याचे दागिने चोरून नेले. दुसरी घटना रायगड चौकात घडली. राहुल तागड (रा. रायगड चौक, सिडको) यांनी पोलिसांत फिर्याद दिली, की शनिवारी रात्री घरच्या पहिल्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता. चोरट्याने घरात प्रवेश करून एक लाख ६४ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

चार लाखांचा ऐवज लपांस

सिडको भागात घरफोडीचे प्रकार सुरूच आहेत. परिसरातील खोडे मळा व रायगड चौक येथे झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी सुमारे चार लाखांचा ऐवज लपांस केला आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakh burglary in CIDCO nashik marathi news