Corona Update : नाशिक शहरात कोरोनाचे आणखी ४ रुग्ण.. पॉझिटिव्ह वृद्धेचे नातलग बाधित

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 18 April 2020

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 17) मालेगावचे 14 जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आले होते. तर, शनिवारी (ता. 18) नाशिक शहरात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्याची संख्या आता 74 वर पोहोचली आहे

नाशिक : नाशिक शहरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत चारने वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड, संजीवनगर वसाहतीतील वृद्ध महिला कोरोनाबाधित निष्पन्न झाली. त्यामुळे तिच्या घरातील नातलगांना ताब्यात घेत त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये तिचे मुंबई व पुण्याहून आलेल्या दोन मुलांसह चौघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 74 वर जाऊन पोहोचली आहे. 

नाशिक जिल्ह्याची संख्या आता 74 वर

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 17) मालेगावचे 14 जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आले होते. तर, शनिवारी (ता. 18) नाशिक शहरात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्याची संख्या आता 74 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेले चौघेही दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह निष्पन्न झालेल्या संजीवनगर वसाहतीतील वृद्ध महिलेचे दोन्ही मुलांसह चौघे आहेत. त्यामुळे संजीवनगर परिसरात आणखी रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून या परिसरात आरोग्य तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा प्राप्त झालेले 28 स्वॅबचे नमुने निगेटिव्ह प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. 
 
तिसऱ्या रिपोर्टची प्रतिक्षा 
दरम्यान, गेल्या 4 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गोविंदनगर येथे आढळून आला होता. शहरातील तो पहिला रुग्ण होता. जिल्हा रुग्णालयात तो दाखल होता. 14 दिवसांच्या उपचारानंतर 15 व्या दिवसाचे स्वॅब तपासणीतून निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 16 व्या दिवसाचा तिसरा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. या रिपोर्टची आरोग्य विभागाला प्रतिक्षा असून, हाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज केले जाऊन राहत्या घरी 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाईल. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण
 
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती 

* जिल्हा रुग्णालय : 7 
* नाशिक महापालिका रुग्णालय : 6 
* मालेगाव : 61 
* एकूण : 74 
* मृत 4 (1 धुळ्यातील मृत युवतीसह) 
* कोरोना मुक्त : 1 

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four more corona patients in Nashik city nashik marathi news