
नाशिकरोड परिसरातील सामनगाव रोड येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक रोड : सामनगाव रोडवरील अरिंगळे मळ्यात एका अल्पवयीन मुलीवर एका संशयित महिलेलच्या अपप्रेरणेने एक विधीसंघर्षित बालक व पाच संशयितांनी मिळून सामुहिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 10) समोर आल्याने नाशिककर हादरले आहेत. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकुण सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी आहे घटना
रविवार (ता. 10) सामनगाव रोडवरील अरिंगळे मळा येथे धक्कादायक घटना घडली. दिपक समाधान खरात (वय १९), रवि शंकर कु-हाडे (वय १९), सुनिल लिंबाजी कोळे (वय २४), आकाश राजेंद्र गायकवाड (वय २४), सोमनाथ विजय घरात (वय १९), पुजा सुनिल वाघ (वय १९) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित पुजा वाघ हिने पीडिताला स्वत:च्या घरी बोलावून घेतले. पीडितेला जरा सुद्धा भनक नव्हती की यामागे काहीतरी षड्यंत्र असेल. पीडिता पुजा हिच्या घरी जाताच संशयित सहा युवक तिथे आले. त्या नराधमांनी आळोपाळीने पीडितेवर अत्याचार केले. पीडिता घडलेल्या प्रकाराने घाबरली होती. पीडितेचे आई-वडील मजुरी करत असल्याने ते कामावर गेले होते. पीडिता भेदरलेल्या स्थितीत गच्चीवर एका कोपऱ्यात जावून बसली. आई घरी येताच मुलीला अशा अवस्थेत बघून घाबरली. आईने विचारले असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. आईने थेट पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल
यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी (ता.10) सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप
अरिंगळे मळा बनतो आहे गुन्हेगारांचे केंद्र
नाशिक रोड येथील अरिंगळे मळा अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखला जातो आहे. गावठी कट्टे सापडणे, कोयते तलवारी, संघटित गुन्हेगारी करणे अशा गोष्टी अरिंगळे मळ्यात राहणारे गुन्हेगार करीत आहे. विशेष म्हणजे गावठी कट्टे विक्रीमध्ये अरिंगळे मळा हा शहरातील नंबर वन म्हणून ओळखला जातोय. बाहेरच्या शहरातील कुख्यात गुन्हेगार अरिंगळे मळ्यात काहीवेळा वास्तव्य करीत असल्याची चर्चा ही परिसरात असल्यामुळे या ठिकाणचे भाड्याने राहणारे भाडेकरू व इतर काही रहिवाशांची सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार