सोन्याने गाठला नवा उच्चांक...! दहा ग्रॅम सोन्यासाठी 'हा' आहे दर

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 5 March 2020

सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने व हिंदू धर्मीयांत लग्नादी विधींसाठी सोन्याला मोठे महत्त्व असल्याने सहाजिकच वधू-वर कुटुंबीयांकडून सोन्याची खरेदी केली जाते. मात्र आज बदलत्या जागतिक परिस्थितीत सोन्याने एकदम उसळी घेतल्याने मध्यमवर्गीय खरेदीदारांचे धाबे दणाणले आहे. वाढत्या भावामुळे देशपातळीवर अक्षरशः अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायातील गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती काही बड्या सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

नाशिक/ पंचवटी : फेडरल रिझर्व्हने आश्‍चर्यकारकरीत्या कमी केलेले 0.50 व्याजदर व डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण यामुळे सोन्याच्या भावाने बुधवारी (ता. 4) नवा उच्चांक गाठला. दहा ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 45 हजार रुपये मोजावे लागत असल्याने भविष्यात मध्यमवर्गीयांच्या सोने खरेदीत मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची भीती व्यावसायिकांत आहे. विशेष म्हणजे जागतिक वातावरण बघता भविष्यात यात मोठ्या वाढीची शक्‍यताही व्यावसायिकांनी वर्तविल्याने सोने 50 हजारांपर्यंत जाते का, अशी भीती सर्वसामान्य खरेदीदारांत आहे. 

दहा ग्रॅम सोन्यासाठी 45 हजार रुपये दर 
भारतीय समाजातील महिलांमध्ये सोन्याचे मोठे आकर्षण आहे. अगदी आदिवासींपासून ते शहरातील उच्चभ्रू महिलांना सोन्याच्या खरेदीत मोठा रस असतो. मात्र मागील वर्षापर्यंत दहा ग्रॅम सोन्यासाठी 30 ते 31 हजार रुपयांपर्यंत सीमित असलेल्या भावाने बुधवारी एकदम उसळी घेतली. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने व हिंदू धर्मीयांत लग्नादी विधींसाठी सोन्याला मोठे महत्त्व असल्याने सहाजिकच वधू-वर कुटुंबीयांकडून सोन्याची खरेदी केली जाते. मात्र आज बदलत्या जागतिक परिस्थितीत सोन्याने एकदम उसळी घेतल्याने मध्यमवर्गीय खरेदीदारांचे धाबे दणाणले आहे. वाढत्या भावामुळे देशपातळीवर अक्षरशः अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायातील गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती काही बड्या सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पूर्वी सोन्याचा एक तोळा म्हणजे 12 ग्रॅम होते, कालांतराने 10 ग्रॅमचा तोळा झाला. 

सोन्याच्या दरातील 95 वर्षांपासूनची वाढ 
(10 ग्रॅम म्हणजे एक तोळ्यासाठी) 
वर्ष किंमत 
1925 18.75 
1950 99.18 
1975 540 
2000 4400 
2015 26,343 
2020 45 हजार (सर्व करांसह) 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

जागतिक वातावरण पाहता भविष्यात यात मोठी वाढ
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सोन्याच्या भावाने आज नवा उच्चांक गाठला. जागतिक वातावरण पाहता भविष्यात यात मोठी वाढ होऊ शकते. - चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold rates reaches new high Nashik Marathi News