नाशिक विभागात नागरिकांची कोरोनावर मात! बरे होण्याचे प्रमाण ९०.९९ टक्के

corona test 1234.jpg
corona test 1234.jpg

नाशिक : नाशिक विभागात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विभागातून आजपर्यंत दोन लाख सहा हजार १०४ रुग्णांपैकी एक लाख ८७ हजार ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यःस्थितीत १४ हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९९, तर मृत्युदर १.९४ टक्के ​

आजपर्यंत विभागात चार हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९९ टक्के, तर मृत्युदर १.९४ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग, नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली. नाशिक विभागातून रविवार (ता.११)अखेर लॅबमध्ये सहा लाख ४८ हजार ३३७ अहवाल पाठविण्यात आले असून, त्यांपैकी दोन लाख सहा हजार १०४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विभागात २४ हजार ५०६ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर एक हजार ३५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 

नाशिक जिल्ह्यात ७६ हजार २४८ रुग्णांना डिस्चार्ज 
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ८५ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ७६ हजार २४८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सात हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.१७ टक्के आहे. आजपर्यंत एक हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के 
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ५१ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४७ हजार १५३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच दोन हजार ६२५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के आहे. आजपर्यंत एक हजार २२६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के 
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजार ८९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १२ हजार दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५२३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. आजपर्यंत ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नगर जिल्ह्यात तीन हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू 
नगर जिल्ह्यात आजपर्यंत ५० हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४६ हजार ८०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच तीन हजार १२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३२ टक्के आहे. आजपर्यंत ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात ५४८ रुग्णांवर उपचार सुरू 
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत सहा हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पाच हजार ३२५ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७५ टक्के आहे. आजपर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com