छत्रपतींविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या वकिल गुणरत्न सदावर्तेंचा सरकारने बंदोबस्त करावा

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 8 October 2020

वकिल गुणरत्न सदावर्ते​ जी विधाने करतात, त्यावरुन ते खरोखर वकिल आहेत, की बनावट याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. सातत्याने गुणवंत सरोदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांसह मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य एका वाहिनीवर केले होते.

नाशिक : वकिल गुणरत्न सदावर्ते हे छत्रपतींविषयी वादग्रस्त विधाने करुन मराठा समाजाच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करतात. सरकारने स्वतः त्यांचा बंदोबस्त करावा, अन्य़था आम्हाला अशा विषवल्लींचा बंदोबस्त करायला वेळ लागणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला आहे. आज शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोर सकल मराठा समाजातर्फे त्याच्या निषेधार्थ येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात आली.

पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

वकिल गुणरत्न सरोदे जी विधाने करतात, त्यावरुन ते खरोखर वकिल आहेत, की बनावट याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. सातत्याने गुणवंत सरोदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांसह मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य एका वाहिनीवर केले होते. याच्या निषेधार्थ एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांना निवेदन देणार आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

छत्रपतींविषयी बोलतांना त्यांची जीभ घसरली.

यावेळी गायकर म्हणाले, सरोदे हे जाणीवपूर्वक गेली काही वर्षे सातत्याने मराठा समाज, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी व छत्रपतींविषयी वादग्रस्त विधाने करुन चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून हे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने आजवर कोणीही त्यांना गांभिर्याने घेतले नव्हते. मात्र काल त्यांनी अक्षरशः कहर केला. मराठी माणुस व सबंध देशाचे आदर्श असलेल्या छत्रपतींविषयी बोलतांना त्यांची जीभ घसरली. त्याबाबत समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहे. यापुढे माध्यमांनी देखील अश व्यक्तीला चर्चेत बोलवावे का, याचा फेरविचार केला पाहिजे.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

आम्ही घटनेनुसार आरक्षण मागतो आहे

सदावर्ते यांनी काल केलेला मुर्खपणा सहन करण्याच्या पलिकडचा आहे. सरकारने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्य़था आम्हाला त्यांचा बंदोबस्त करायला वेळ लागणार नाही ते म्हणाले, आज भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने राज्य चालते, हे सर्वांना माहित आहे. मात्र डॉ. आंबेडकरांनी सुद्धा शाहू महाराजांविषयी आदर व्यक्त केलेला आहे. सदावर्ते ज्या आरक्षणाविषयी बोलतात, त्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजच आहेत, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. आज राजेशाही नाही, हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच आम्ही घटनेनुसार आरक्षण मागतो आहे. राजेशाही असती, तर तुमचे काय झाले असते, याचा विचार सदावर्ते यांनी करावा, अशा इशारा दिला.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार गवळी, चेतन शेलार, निलेश शेलार, तुषार जगताप, गणेश कदम, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील यांसह विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government should action agianst Advocate Gunaratna Sarode nashik marathi news