गरिबांची दिवाळी गोड! पंजाब शांत झाल्याने शिधापत्रिकेवर धान्य; विस्कळित झालेली पुरवठा व्यवस्था पूर्ववत  

ration shop.jpg
ration shop.jpg

नाशिक रोड : पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलनामुळे विस्कळित झालेली पुरवठा व्यवस्था पूर्ववत झाल्याने दिवाळीच्या आत २३० दुकानांना धान्य पोचणार आहे. शहरात २३० पैकी १८० दुकानांना मनमाडवरून गाडीने धान्य पोचविण्यात आले आहे. त्यामुळे रेशनच्या धान्यावर दिवाळी अवलंबून असणाऱ्या गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. 

नाशिक शहरात २२९ पैकी १८० दुकानांत धान्य 

पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचा फटका नाशिक शहराच्या पुरवठा विभागाला बसला आहे. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून, मनमाडपर्यंत धान्य पोचले आहे. नाशिकच्या पुरवठा विभागाने हे धान्य सध्या १८० दुकानांना पोचवले आहे. शहरात २३० दुकाने असून, दहा हजार ७७५ अंत्योदय कार्डधारक आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थी असणाऱ्या व्यक्तींची संख्या तीन लाख ९७ हजार ७६५ आहे. नाशिक शहरात अंत्योदय योजनेंतर्गत महिन्याला २८०१.५० क्विंटल गव्हाचा, तर ९६९.७५ क्विंटल तांदळाचा पुरवठा होतो. १०७.७५ क्विंटल साखर लाभार्थ्यांना दिली जाते. सध्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना प्रत्येक कार्डावर ३५ किलो धान्य दिले जाते. 

दिवाळीपर्यंत धान्य 
येत्या १४ नोव्हेंबरला दिवाळीच्या आत उर्वरित पन्नास दुकानांना धान्य पोचवण्यात येणार असून, यामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलनामुळे नाशिक शहराला दिवाळीपूर्वी धान्य मिळते की नाही, असा प्रश्न पुरवठा विभागासमोर निर्माण झाला होता. मात्र उशिरा का होईना मनमाडपर्यंत नियोजित धान्य पोचले असून, ते सध्या दुकानांपर्यंत पोचवले जात आहे. 

शहरातील रेशन कार्डधारक 
अंत्योदय १०७७५ 
प्राधान्य कुटुंब लाभार्थी ९०७२५ 

केसरी १४८५९८ 
शुभ्र शिधापत्रिका ४३४२८ 


धान्य यायला उशीर होत असल्यामुळे सध्या १८० दुकानांत धान्य पोचवले असून, गाड्यांची कमतरता आहे. गहू, तांदूळ, डाळ, साखर दुकानांना पोचवली आहे. दिवाळीच्या आत सर्व दुकानांत धान्यपुरवठा होईल, असा विश्‍वास आहे. - श्‍वेता पाटोळे (शहर धान्य वितरण आधिकारी ) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com