गावाची निवडणूक झाली ग्लोबल! उमेदवारांचा ग्रामपंचायत निवडणूकीत हायटेक प्रचार

Gram Panchayat elections are being campaigned on social media nashik marathi news
Gram Panchayat elections are being campaigned on social media nashik marathi news

इगतपुरी (जि. नाशिक) : ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीमुळे उमेदवारांचा पारंपारिक प्रचाराबरोबर हायटेक प्रचार जोरात सुरु आहे. यामुळे दरवर्षी गावच्या पारावर होणाऱ्या चर्चांची जागा यंदा हायटेक प्रचाराने घेतली आहे. त्यामुळे फक्त गावात फिरुन केला जाणारा ्प्रचार यावेळी मात्र थेट ग्लोबल केला जातोय.. 

प्रचाराने गावच्या सीमा ओलांडल्या

इगतपुरी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या १५ जानेवारीला होत आहेत. निवडणूकांचा दिवस जसजसा जवळ येउ लागला आहे. तसतसा ग्रामपंचायतीची निवडणूकात रंगत वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही त्याच गावापूरतीच अवलंबून असते. मात्र आता सोशल मिडिया मार्फत व्हॉटस अँप,फेसबुकमुळे गावपातळीवर प्रचार न राहता संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात पोहचत आहे त्यामुळे उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरु आहे. एका गावा पुरता हा प्रचार मर्यादीत राहिलेलाच नाही. 

अन्  प्रचार सुरु झाला..

सोमवारी निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले.त्यामुळे सोमवारपासूनच उमेदवारांनी हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे.सोशल मिडियाच्या व्हॅटसअँप,फेसबुक इन्स्टाग्रामवर,फोटो व्हिडिओ क्लिप,तसेच उमेदवारांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे,आणि प्रचाराच्या पोस्ट टाकण्याचे काम सुरू केले आहे.दरम्यान,उमेदवारांनी वैयक्तिक व प्रभागातील उमेदवारांचे एकत्र डिझाइन तयार करत असून सोशल मिडियावर अपलोड करत आहेत. 


पारावर नव्हे सोशल मिडायावर गप्पा 

गावातील निवडणूकांसाठी व्हॉटसअप महत्वाचे प्रचार साधन झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूका आल्या म्हणजे गावातील पारावरच्या चर्चा आणि चहांच्या टपऱ्यांवर चर्चांना उधाण यायचे मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुकी प्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत रंगत आहे. गावपातळीवरील तंटे,लोकांमधील नाराजी, नाराजी दूर करण्यचे प्रयत्न, घरोघर रंगणारे रुसवे फुगवे याची जाहीर चर्चा आता सोशल मिडियावर होउ लागली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com