esakal | आजीच्या मृत्यूला नातूच ठरला 'असा' कारणीभूत...नातवावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

old woman.jpg

नातू त्याच्या आईची आई राजकोरबाई मांडवडे (वय ६०) यांना मालेगावहून धुळ्याकडे घेऊन जाताना हा अपघात झाला. अन् त्यावेळी असे काही घडले की नातवावर गुन्हा दाखल झाला

आजीच्या मृत्यूला नातूच ठरला 'असा' कारणीभूत...नातवावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : नातू त्याच्या आईची आई राजकोरबाई मांडवडे (वय ६०) यांना मालेगावहून धुळ्याकडे घेऊन जाताना हा अपघात झाला. अन् त्यावेळी असे काही घडले की नातवावर गुन्हा दाखल झाला.

आजीच्या मृत्यूला नातूच ठरला 'असा' कारणीभूत..
११ जुलैला सायंकाळी हा अपघात घडला होता. महेंद्र गांगुर्डे त्याच्या आईची आई राजकोरबाई मांडवडे (वय ६०) यांना मालेगावहून धुळ्याकडे घेऊन जाताना हा अपघात झाला. यात राजकोरबाई खड्ड्यात दुचाकी आदळल्याने खाली पडून जबर मार लागल्याने जागीच ठार झाल्या. पोलिसांनी चौकशीनंतर राहुल देवरे (वय २७, श्रीपुरवडे) याच्या तक्रारीवरून आजीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

आजीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा व अपघाताचा गुन्हा

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात रस्त्याची परिस्थिती व खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत भरधाव दुचाकी (एमएच ४१, बीए ८२५२) चालवून दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्ध आजीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महेंद्र अशोक गांगुर्डे (रा. श्रीपुरवडे, ता. बागलाण) या नातवाविरुद्ध येथील तालुका पोलिस ठाण्यात आजीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा व अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क