सुदृढ आरोग्‍यासाठी नाशिकमध्ये जिम व्‍यवस्‍थापन सज्‍ज! निर्जंतुकीकरणावर भर 

gym 123.jpg
gym 123.jpg

नाशिक : दसऱ्यापासून रविवारी (ता.२५) जिमची दारे उघडणार असल्‍याचे मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी जाहीर केले असून, यामुळे जिम व्‍यवस्‍थापक आणि आरोग्‍य प्रेमींमध्ये चैतन्‍य निर्माण झाले आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून जिम बंद असल्‍याने यंत्रांवरील धूळ झटकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सुदृढ आरोग्‍यासाठी जिम व्‍यवस्‍थापन सज्‍ज 

नियमावली (एसओपी) चे पालन करून जिम खुले होणार असून, व्‍यवस्‍थापनाकडून निर्जंतुकीकरणासह अन्‍य बाबींवर भर दिला जाणार आहे. 
लॉकडाउन जाहीर झाल्‍यानंतर काही दिवसांतच नागरिकांकडून नाराजीचा सूर व्‍यक्‍त होत होता. सकाळी फेरफटका (मॉर्निंग वॉक) ला जाणारे, जिम, व्‍यायामशाळा खुल्‍या करण्याची मागणी केली जात होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिम बंद ठेवण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतलेला होता. परंतु कोरोना काळात आरोग्‍याचे चांगले महत्त्व पटले असल्‍याने, आगामी काळात जिम, व्‍यायामशाळांमध्ये जाऊन चांगले आरोग्‍य राखण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांची संख्या वाढणार असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. 

धूळ झटकली : एसओपीच्‍या पालनासह जिम खुली होणार
दरम्‍यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी येत्‍या दसऱ्यापासून जिमची दारे उघडणार असल्‍याचे जाहीर केल्‍यानंतर व्‍यायाम प्रेमींमध्ये उत्‍साह संचारला आहे. व्‍यवस्‍थापनाकडूनदेखील जिमच्‍या स्‍वच्‍छतेची काम हाती घेतले गेले आहे. धूळ झटकणे, यंत्र सामग्रीची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. निर्जंतुकीकरणासाठी आवश्‍यक सामग्रीची जमवाजमव सुरू झाली असून, सदस्‍यांकडूनही जिम व्‍यवस्‍थापकांशी संपर्क साधला जातो आहे. 


अशी आहे नियमावली 
* एकाच वेळी मर्यादित सदस्‍यांची उपस्‍थिती असावी. 
* प्रत्‍येक तासाला आणि जिमची वेळ संपल्‍यावर निर्जंतुकीकरण कावे. 
* मास्‍कचा वापर बंधनकारक असेल, सुरक्षित अंतर राखावे लागेल. 
* नियमितपणे सदस्‍यांचे थर्मल स्‍कॅनिंग करत नोंद करावी लागेल. 
* प्रशिक्षकांची वेळोवेळी तपासणी करावयाची आहे. 
निजुर्तंकीकरण करून, सर्व्हिस, शासनाच्‍या प्रयत्‍न. 


जिम बंद असल्‍याने सदस्‍यांकडून सारखी चौकशी केली जात होती. आता जिम खुल्‍या होणार असल्‍याने सर्वांमध्ये उत्‍साह वाढला आहे. ॲब्‍सचे संस्‍थापकांनी जिम खुल्‍या होण्यासंदर्भात पाठपुरावा करताना नियमावली ठरविण्यात योगदान दिले आहे. सर्वांत मोठी जिम असल्‍याच्‍या नात्‍याने आम्‍ही या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करू. - अभय नेरकर, संचालक, 
ॲब्‍स फिटनेस ॲण्ड वेल‍नेस क्‍लब 


जिम सुरू होत असून, ही आनंदाची बाब आहे. मर्यादित सदस्‍यांना प्रवेश, नियमित तपासणीसह अन्‍य विविध नियमावलीचे पालन करणार आहोत. कोरोना काळात आरोग्‍याचे महत्त्व सर्वांना पटलेले असून, सुदृढ राहण्यासाठी आगामी काळात जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढेल असा मला विश्र्वास आहे. 
- सुनील रायते, संचालक, लिओ फिटनेस क्‍लब. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम सुरू करण्याच्‍या महत्त्वाच्‍या घोषणेचे आम्‍ही स्‍वागत करतो. व्‍यायामासाठी येणाऱ्या सदस्‍यांच्‍या हितासाठी घालून दिलेल्‍या नियमावलीचे पालन करणार आहोत. 
अनेकांकडून जिम सुरू होण्याबाबत प्रतीक्षा सुरू होती, अखेर व्‍यायामाद्वारे चांगले आरोग्‍य राखण्यास मदत होणार आहे. - अमित बोरस्‍ते, संचालक, ऊर्जा फिटनेस. 

जिममध्ये उत्‍साहाचे वातावरण असल्‍याने शरीरयष्टी साकारण्यात जलदगतीने यश येते. एकमेकांना प्रोत्‍साहन देता येत असल्‍याने अनेकांकडून जिमला प्राधान्‍य दिले जाते. जिम सुरू होत असल्‍याने अशा आरोग्‍य प्रेमींना दिलासा मिळाला आहे. नियमांचे पालन करून जिममध्ये घाम गाळताना चांगले आरोग्‍य मिळविता येईल. - आदित्‍य कुलथे, आयएसएसए सर्टीफाईड आहारतज्‍ज्ञ व प्रशिक्षण  

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com