महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक महापालिकेचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

नाशिक जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र केसरीचा मान मिळाल्याने पालकसंस्था म्हणून महापालिकेच्या वतीने त्याचा गौरव व्हावा, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर स्थायी समितीमध्ये झालेल्या बैठकीत त्याच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. महापालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा गौरव करण्याबरोबरचं त्याची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नाशिक : नुकत्याच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने बाजी मारली. यावेळी नाशिकचे नाव हर्षवर्धन सदगीर याने झळकावले. महाराष्ट्र केसरीच्या चांदीची गदा पहिल्यांदाच नाशिकला मिळाली.. त्यासाठी त्याचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्याला महापालिकेचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर; म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हर्षवर्धनचा गौरव व ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

नाशिक जिल्ह्याला प्रथमच महाराष्ट्र केसरीचा मान मिळाल्याने पालकसंस्था म्हणून महापालिकेच्या वतीने त्याचा गौरव व्हावा, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर स्थायी समितीमध्ये झालेल्या बैठकीत त्याच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. महापालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा गौरव करण्याबरोबरचं त्याची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापुर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचा गौरव करुन महापालिकेने तिची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्‍ती केली होती.

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

कुस्तीचे प्रेम त्याला गप्प बसू देत नव्हते

हर्षवर्धन मूळचा कोंभाळणे (ता. अकोले, जि. नगर) येथील. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हर्षवर्धन वयाच्या अकराव्या वर्षी बलकवडे व्यायामशाळेत दाखल झाला. त्याने भगूरच्या ति. झं. विद्यामंदिरमध्ये शालेय शिक्षण करत गोरखनाथ बलकवडे, त्यांचा मुलगा विशाल, राम परिहार या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डाव खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर देवळाली कॅम्पच्या एस.व्ही.के.टी. महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. दरम्यान, तो सैन्यदलात दाखल झाला. मात्र, कुस्तीचे प्रेम त्याला गप्प बसू देत नव्हते. तो सैन्यदलातून पुन्हा भगूरला परतला आणि पुढील शिक्षणासाठी त्याने कळवण तालुक्‍यातील महाविद्यालयात प्रवेश घेतला

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshwardhan Sadgir is brand ambassador of Nashik Munciple Corporation Nashik Marathi News