उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना लोकशाहीला काळीमा फासणारी - छगन भुजबळ

 Hathras incident in Uttar Pradesh is a disgrace to democracy
Hathras incident in Uttar Pradesh is a disgrace to democracy

नाशिक : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीवे मारून टाकण्यात आले. या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तिचे अंत्यदर्शन घेऊ न देता पोलिसांनी रात्रीतून अंत्यसंस्कार केले. या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी व प्रियंका गांधी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटना लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले. 

पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, की देशातील मोठ्या नेत्याला अशी वागणूक मिळते, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच कुठल्याही नेत्याला अशी वागणूक देणे ही बाब निषेधार्ह्य आहे. महाराष्ट्रात काही नसताना महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम केले जाते आणि उत्तर प्रदेशात काय नेमकं काय घडतंय? देशातील जनतेने त्याचा निषेध करायला हवा. 


नाशिकमध्ये आज निदर्शने 

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ संविधान प्रेमी नाशिककरांतर्फे शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पाचला ईदगाह मैदानावर निदर्शने करण्यात येतील. बलात्कार आणि खूनाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असून अंत्यसंस्कारात सहभागी होऊ दिले नाही हे मोठे षडयंत्र आहे. त्याचा निषेध केला जाणार आहे, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com