VIDEO : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या घरांवर अचानक दगडफेक..फक्त दहशत..सीसीटिव्हीत उघड

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 17 April 2020

या सर्व घटनेबाबत काही नागरिक हिंमत करून समोर आले व याबाबत पोलिसांकडे तक्रार मांडू लागले, मात्र या ठिकाणी आलेले पोलीस अधिकारी यांनी नागरिकांकडून घटनेची माहिती घेण्याअगोदरच महिलांसमोर नागरिकांनाच  शिवीगाळ केली. घटनेनंतर संशयित टवाळखोरांवर वर कारवाई करणे अपेक्षित असतांना, पोलिसांनी तक्रारदार नागरिकांनाच अरेरावीची भाषा केली

नाशिक / सिडको : सध्यस्थीतीत लॉकडाऊन सुरू असल्याने कलम १४४ लागू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना बाहेर निघण्यास मनाई असताना सिडको भागात मात्र टवाळखोर गुंडांचा उपद्रव सुरू आहे. त्यांनी असा प्रकार केला की सध्या परिसरात दहशत माजली आहे.

असा घडला प्रकार
गुरुवारी दुपारच्या सुमारास सिंहस्थ नगर, तुळजा भवानी चौक येथे काही टवाळखोर युवक अंमली पदार्थाची नशा करत होते. हा एक प्रकार तेथील नागरिकांच्या लक्षात येताच काहींनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने युवकांनी त्यांच्या इतर १४ ते १५ साथीदारांना बोलून घेत या चौकातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर रस्त्यातील दुचाकी ढकलून देत त्यांचे नुकसान करीत नागरिकांना शिवीगाळ करून दहशद माजवली. व हा प्रकार करुन तेथून त्यांनी पळ काढला. या संपूर्ण घटनेमुळे घाबरलेले नागरिक रस्त्यावर जमा झाले होते. घटनेनंतर काही नागरिकांनी तक्रार करण्यासाठी अंबड पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा वरिष्ठांशी संपर्क साधून या घटनेबाबत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेत तब्बल १४ ते १५ गुंड असताना पोलिसांनी केवळ ४ च संशयित दाखवले. शिवाय घटनेबाबत पोलीस गांभीर्य घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!

पोलीसांची महिलांसमोर नागरिकांनाच शिवीगाळ

चौकात बसायला विरोध केला म्हणून १४ ते १५ जणांच्या टोळक्याने नागरिकांच्या घरावर दगडफेक करीत अनेक दुचाकी सायकल रस्त्यावर पाडून दहशद निर्माण केली. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.या सर्व घटनेबाबत काही नागरिक हिंमत करून समोर आले व याबाबत पोलिसांकडे तक्रार मांडू लागले, मात्र या ठिकाणी आलेले पोलीस अधिकारी यांनी नागरिकांकडून घटनेची माहिती घेण्याअगोदरच महिलांसमोर नागरिकांनाच  शिवीगाळ केली. घटनेनंतर संशयित टवाळखोरांवर वर कारवाई करणे अपेक्षित असतांना, पोलिसांनी तक्रारदार नागरिकांनाच अरेरावीची भाषा केली. पोलिसांच्या या भूमिकेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून सदर घटनेतील टवाळखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hooligans terror in lockdown nashik cidco marathi crime news