esakal | जेलरोडला भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार, ट्राफिक जाम
sakal

बोलून बातमी शोधा

accident jailrod.jpg

जेलरोड रस्त्यावर शाळा, प्रेस, रहिवाशी वाहतूक असल्याने हा रस्ता अवजड वाहतुकी साठी बंद करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहने कोणालाही न जुमानता या रस्त्याने वाहतूक करतात. ही रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करावी या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

जेलरोडला भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार, ट्राफिक जाम

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड  ः रस्ता ओलांडत असतांना जेलरोड कडून बिटको जाणाऱ्या मालट्रक व दूचाकीची यांच्यात झालेल्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकचे चाक पती-पत्नीच्या डोक्यावरून गेल्याने जागीच ठार

लाखलगाव येथील चंद्रभान अशोक जाधव (वय४१) हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच १५ एफ वाय ७२०३ वरून पत्नी सोबत प्रेसरोड, कन्या शाळेकडून रस्ता ओलांडत  जेलरोडकडे जात असताना, जेलरोडकडून येणाऱ्या माल ट्रक क्रमांक (एम एच ०४ डी एस ३५१४) ने जोरदार धडक दिली. त्यात माल ट्रकचे चाक पती पत्नी यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

मालट्रक चालकाला घेतले ताब्यात

घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, साहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, साह्ययक पोलीस निरीक्षक विलास शेळके व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. मालट्रक चालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीला जोर
जेलरोड रस्त्यावर शाळा, प्रेस, रहिवाशी वाहतूक असल्याने हा रस्ता अवजड वाहतुकी साठी बंद करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहने कोणालाही न जुमानता या रस्त्याने वाहतूक करतात. ही रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करावी या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.