husband wife death.jpg
husband wife death.jpg

थरारक! संशयाच्या भूताने संसाराची राखरांगोळी.. आधी पत्नीला पाठवले यमसदनी...मग पतीचीही एक्झिट!

नाशिक / पेठ :  पत्नीच्या चारित्र्यांवर पती संशय घेत असल्याने दोघात वारंवार भांडणे होत असत. शनिवारी रात्री जेवणं आटोपल्यानंतर मुलगा आपल्या कुटूंबासमवेत घरात झोपी गेला. तर पती- पत्नी बाहेर पडवीत झोपले. रात्रीचे ११ वाजता दोघात भांडण झाले. विकोपास गेलेल्या रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी फावडयाने डोक्यात वार केला. अन् मग...

थरारक...काय घडले नेमके?

सविस्तर असे की.. करंजाळी जवळील उभीधोंड (ता.पेठ) येथील रहिवासी सोमनाथ सिताराम गवळी आपली पत्नी विठाबाई समवेत मोठा मुलगा जगन हे त्यांच्या शेतातील घरात राहत होते. पत्नी विठाबाई सोमनाथ गवळी (वय 42) हिच्या चारित्र्यांवर पती सोमनाथ नेहमी संशय घेत असल्याने दोघात वारंवार भांडणे होत असत. शनिवारी (ता.११) रोजी रात्री जेवणं आटोपल्यानंतर मुलगा जगन आपल्या कुटूंबासमवेत घरात झोपी गेला. तर सोमनाथ व विठाबाई बाहेर पडवीत झोपले. रात्रीचे ११ वाजता दोघात भांडण झाले. विकोपास गेलेल्या रागाच्या भरात सोमनाथने पत्नी विठाबाईच्या डोक्यात लोखंडी फावडयाने डोक्यात वार केल्याने ती जागीच ठार झाली. सकाळी (ता12) रविवार उठल्यावर आईचा खुन झाल्याचे मुलगा जगनच्या लक्षात येताच त्याने लागलीच पेठ पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यावेळी जगन याने वडिलांची शोधशोध केली असता तें आढळून आले नाही.

पतीनेही घेतली एक्झिट..

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता विठाबाईचा खुन झाल्याची खात्री होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नी विठाबाईच्या अंत्यविधीला सोमनाथ हजर नसल्याने खुनाच्या संशयाची सुई सोमनाथकडे वळली .
पोलीस खात्याने गुन्हा शोध मोहिम सुरू केली असता आज (ता.13)सोमवार सकाळी मयत विठाबाईचा पती सोमनाथ सिताराम गवळी ( वय 45) याने स्वत:च्या शेतातील आपसुंदीच्या झाडाच्या फांदीला कापडी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फास घेतलेला मृत्यदेह झाडाला लटकलेला आढळून आला. याबाबत पोलिस पाटील निवृती गवळी यांनी पेठ पोलिसात खबर दिली .पेठ पोलीसात या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

संशयाच्या भूताने संसाराची राखरांगोळी

पत्नीच्या चारित्र्यांच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फावडयाने वार करुन खून करुन घटनेनंतर फरार झालेल्या पतीचा फाशी घेतलेला मृत्यदेह( तिसऱ्या दिवशी ) स्वताच्या शेतातील झाडाला लटकलेला आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयाचे भूत मनात बसल्याने पत्नीच्या हत्येनंतर पतीने केलेल्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सपोनि संदीप वसावे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार शेख करीत आहेत .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com