esakal | सेल्फी, चेस, मनोरंजनासह आधुनिक कोविड सेंटर ठरतयं आदर्श मॉडेल! एकदा वाचाच.. 
sakal

बोलून बातमी शोधा

covid center 12345.jpg

महापालिकेने कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन क्रेडाईच्या मदतीने ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे. पाच ऑक्सिजन बेडशिवाय ३५० बेडच्या केंद्रात टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉइंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी-सुविधांनी परिपूर्ण कोविड केअर सेंटर एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सेल्फी, चेस, मनोरंजनासह आधुनिक कोविड सेंटर ठरतयं आदर्श मॉडेल! एकदा वाचाच.. 

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेने कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन क्रेडाईच्या मदतीने ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे. पाच ऑक्सिजन बेडशिवाय ३५० बेडच्या केंद्रात टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉइंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी-सुविधांनी परिपूर्ण कोविड केअर सेंटर एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 
नाशिक महापालका आणि क्रेडाई यांच्यातर्फे ठक्कर डोम येथे उभारलेल्या कोविड केअरच्या उद्‌घाटनप्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. 

ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन 
महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक विलास शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड, निमाचे शशिकांत जाधव, गिरीश पालवे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, अतुल शिंदे, हंसराज देशमुख, अंजन भालोडिया, नरेंद्र कुलकर्णी, हितेश पोतदार, डॉ. कैलास कमोद आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य
भुजबळ म्हणाले, की कोविडची वाढती संख्या बघता मुंबई-पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी व्यवस्था केली आहे. या केंद्रातूल रिक्रिएशन कक्षात खेळ, पुस्तके, टीव्ही यासह मनोरंजन, योगा, मेडिटेशनची सोय आहे. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी ही व्यवस्था केली गेली आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल अशा नियोजनाचे निर्देश दिले. 

सेल्फी पॉइंट यासह मनोरंजनाच्या सुविधा
महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, की कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रित काम करीत आहे. श्री. गमे म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात एक हजार २०० पथके काम करत आहे. पुण्या-मुंबईच्या धर्तीवर ठक्कर डोम येथे राज्यातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर आहे. उपचारासोबत रिक्रिएशन सेंटर असून, सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सोयी-सुविधा आहेत. क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले, की क्रेडाईने सामाजिक भान ठेवून कोविड केअर सेंटर उभारले आहे. सोयी-सुविधांनीयुक्त असलेल्या या केंद्रात ३५० बेड, पाच ऑक्सिजन बेड, टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉइंट यासह मनोरंजनाच्या सुविधा आहेत. 

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

आयुक्तांकडून खासगी डॉक्टरांचे कौतुक 
नाशिक शहरातील खासगी डॉक्टरांकडून रुग्णांना सेवा दिली जात आहे. रुग्णांच्या लुटीसंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेतल्यानंतर नियुक्त पथकास चांगले सहकार्य करण्यात आले. रुग्णांना पैसे परतही करण्यात आले आहेत. आज लुटीसंदर्भात कुठलीही तक्रार नसल्याचे सांगत नियुक्त पथक व खासगी डॉक्टरांचे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कौतुक केले. 

संपादन - ज्योती देवरे