इगतपुरी, घोटीत खरेदीसाठी उत्साह; अवकाळीचा तडाखा बसूनही ग्राहकांची गर्दी 

विजय पगारे
Tuesday, 10 November 2020

दिवाळीनिमित्त इगतपुरी व घोटी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पहायला मिळत आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे पावसामुळे आलेली मरगळ गेल्यासारखे वाटत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक/इगतपुरी : दिवाळीनिमित्त इगतपुरी व घोटी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पहायला मिळत आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे पावसामुळे आलेली मरगळ गेल्यासारखे वाटत असल्याचे चित्र आहे. 

दिवाळी म्हटली की, सर्वात जास्त महत्त्व केरसुणीला असते. केरसुणी म्हणजे लक्ष्मीचे रूप. केरसुणीबरोबरच महालक्ष्मी, शेतातील धनधान्य यांचेही पूजन केले जाते. बाजारात मोठी केरसुणी ४० ते ६० रुपयांप्रमाणे तर लहान देवीच्या केरसुणी १० ते २० रुपयांप्रमाणे मिळत आहेत. महालक्ष्मी १५, २०, २५ व मोठी ३० ते ४० रुपयांप्रमाणे मिळत आहे. छोट्या प्लॅस्टिकच्या लक्ष्मीचे पाय, चित्र विविध रंगांच्या रांगोळ्या, झेंडूची फुले, विविध कलाकुसरीच्या पणत्या, रंगीबेरंगी आकाशकंदील, फळे, मिठाईंची दुकाने सजली आहेत. रांगोळ्यांच्या पुड्या ५ रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे. लक्ष्मीचे पाय (प्लॅस्टिकचे) १० रुपये, आकाशकंदील वेगवेगळ्या प्रकारात आहेत. १५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत किंमत होती. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

लक्ष्मीपूजनासाठी चोपड्यांना मागणी 
व्यापारी तसेच व्यावसायिकांना दैनंदिन व्यवहारासाठी लक्ष्मीवह्या (चोपड्या) तारखांच्या अरुंद व लांब वह्या, कॅश मेमो लागतात. या वह्या बहुतेक दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करतात. मोठे व्यापारी यापूर्वीच खरेदी करून ठेवतात. दर दीपवालीला नवीन वह्या, डायर्‍या, मोठे रजिस्टर खरेदी करतात, अशी माहिती उत्तमराव महाजन यांनी दिली. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Igatpuri, Ghoti Excitement for Diwali shopping nashik marathi news