रामाच्या पंचवटीत भक्त हनुमानाची उपेक्षा! ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

योगेश मोरे 
Monday, 2 November 2020

धार्मिक शहर अशी ओळख असलेल्या श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावनभूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकच्या पंचवटीतील गोदाघाटावर अनेक मंदिरे आहे. त्यात अहिल्याबाई होळकर पूल ते रोकडोबा हनुमान मंदिरापर्यंत श्रीरामभक्त हनुमानाच्या ४१ मूर्ती आहेत.

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटीतील गोदाघाटावर नाशिकच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत; परंतु याच परिसरातील ३५ हनुमानमूर्ती दुर्लक्षित असून, हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

रामाच्या पंचवटीत भक्त हनुमानाची उपेक्षा 
धार्मिक शहर अशी ओळख असलेल्या श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावनभूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकच्या पंचवटीतील गोदाघाटावर अनेक मंदिरे आहे. त्यात अहिल्याबाई होळकर पूल ते रोकडोबा हनुमान मंदिरापर्यंत श्रीरामभक्त हनुमानाच्या ४१ मूर्ती आहेत. त्याची डीएसएलआर मॅपमध्ये नोंदीनुसार या पुरातन मूर्ती आहेत. मात्र सध्या गोदाघाटावर स्मार्टसिटीची कामे सुरू असल्याने प्राचीन व पुरातन मंदिरांचा इतिहास जतन करणे दूरच पण पर्यटनाच्या दृष्टीने गरजेच्या जवळपास ३५ हनुमान मूर्ती उपेक्षित आहेत.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

गोदाघाटावर ३५ प्राचीन मूर्ती दुर्लक्षित 

हनुमान जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, पद्माकर पाटील, नरेंद्र धारणे, अतुल शेवाळे, योगेश रामैया, चिराग गुप्ता, उमापती ओझा, किशोर गरड, बाबा दोडे, नंदू पवार, जयकृष्ण दवे, ऋतुल जानी आदींनी याकडे महापालिकेसह पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गोदाघाटावरील ४१ हनुमानमूर्तींची अभिषेक करीत पूजा केली होती. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

यंत्रणा उदासीन 
महापालिकेत रामाचे नाव घेऊन कामकाज करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. याच मुद्द्यावर भाजपने अनेक निवडणुका लढल्या. सद्यःस्थितीत अन् लॉकमध्ये राज्य शासन मंदिर सुरू करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत, भाजपतर्फे मंदिरे उघडावीत या मुद्द्याहून भाजपची राज्यभरात आंदोलनेदेखील सुरू आहेत; परंतु नाशिक महापालिकेत एकहाती सत्ता असूनही गोदाघाट परिसरात रामभक्त हनुमानांच्या ४१ उपेक्षित मूर्तींच्या उपेक्षेचा मात्र भाजपच्या नेत्यांनाही विसर पडला आहे. 

गोदाघाट परिसरात ४१ हनुमानमूर्तीपेकी ३५ मूर्ती भग्नावस्थेत आहेत. प्रत्येक मूर्तीला वेगळा इतिहास आहे. प्राचीन मूर्तीच्या संगोपनासह त्यांचे जतन राज्य सरकारच्या पर्यटन विकास महामंडळांतर्गत अथवा राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले गेले पाहिजे. -देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते 

हनुमानाच्या बऱ्याच मूर्ती भग्नावस्थेत असल्याने नागरिक, भक्त भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालीत इतिहास जतन होईल या अनुषंगाने योग्य ते नियोजन करावे. -कृष्णकुमार नेरकर, स्थानिक  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ignored 35 Hanuman idols in panchvati nashik marathi news