भरारी पथकाला खबर होतीच....पिक-अप वाहनाची झडती घेतली असता 'हे' काय निघाले?

pick up action.jpeg
pick up action.jpeg

नाशिक : परराज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मद्यसाठा पकडला. म्हसरूळ परिसरातून पिक-अप वाहनासह 17 लाखांचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. चालक वाहन सोडून फरारी झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. 

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 

नगर-दादर-हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्मिती करण्यात आलेला आणि राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्यसाठ्याची शहरात वाहतूक केली जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक हृषीकेश फुलझळके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (ता. 17) पहाटे दिंडोरी रोडवर सापळा रचला होता. म्हसरूळ नजीक अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा पिक-अप (एमएच 48, एजी 2210) एक्‍साइजच्या पथकाने रोखला. त्या वेळी पिक-अपचालक आपले वाहन सोडून फरारी झाला. पथकाने वाहनाची झडती घेतली असता, ब्लेंडर प्राइड, रॉयल चॅलेंज, रॉक फोर्ड व्हिस्की, बडवायझर बिअर, ग्रीन किंग (अरबेला) व्होडका, इम्परिअल ब्ल्यू, ऑफिसर चॉइस ब्रीझर असा वाहनासह सुमारे 17 लाख चार हजार 980 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"अ' विभागाचे वसंत कौसडीकर, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक हृषीकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, योगेश चव्हाण, सी. एच. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकरे, जवान गौरव तारे, आर. बी. झनकर, एस. ए. माने, व्ही. ए. चव्हाण आदींच्या पथकाने कारवाई केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com