नवीन शैक्षणिक धोरणात योग शिक्षणाचा समावेश करा; योग शिक्षक महासंघाची मागणी

हर्षस गांगुर्डे
Thursday, 22 October 2020

योग हे भारतीय संस्कृतीचे अंग असून विज्ञानाचा सर्वोत्तम असा विषय आहे. तो केवळ शारीरिक नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्तरावर कार्य करतो.

नाशिक/गणूर : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये योग शिक्षणाचा समावेश केवळ शारीरिक शिक्षणामध्ये न करता मुख्य विषय म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अभ्यासक्रमात करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली. यावेळी चांदवड उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. 

योग हे भारतीय संस्कृतीचे अंग असून विज्ञानाचा सर्वोत्तम असा विषय आहे. तो केवळ शारीरिक नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्तरावर कार्य करतो. त्याचा उल्लेख पौराणिक वेद, उपनिषद, रामायण, महाभारत व इतर सर्व पवित्र ग्रंथामध्ये आलेला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर जर योगाचे संस्कार केले तर त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती होईल व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास खूप चांगली मदत होईल. त्यामुळे योग शिक्षणाचा मुख्य विषयात समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी व नाशिक विभाग प्रमुख योग प्रशिक्षक राहुल बी., बाळा पाडवी, तुषार झारोळे, पुंडलिक गांगुर्डे, कल्पेश आबड, राजेश झारोळे कृष्ण जगताप उपस्थित होते. 

 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incorporate yoga education into the new educational policy nashik marathi news