"म्हाडांतर्गत 'इथे' ७०० घरे बांधून देणार"

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 10 February 2020

काही नागरिकांनी पास्तेला बारामती करण्याची मागणी केली. मात्र, उभ्या आयुष्यात बारामतीची बरोबरी आपण करू शकणार नसल्याचे सांगत सिन्नर तालुक्‍यातील बेरोजगारांसाठी इंडिया बुल्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री आव्हाड यांनी दिली.

नाशिक : किमान 700 लोकांना म्हाडा योजनेंतर्गत घरे बांधून देण्याचा आपला मानस असून, सिन्नरचा भूमिपुत्र त्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या जन्मगाव असलेल्या पास्ते येथे केले. 

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा संकल्प 

मंत्री आव्हाड म्हणाले, की वंजारी समाजाच्या सिन्नर शहरातील आडवा फाटा येथील तेरा एकर जागेत वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या तारांचे टॉवर्स होते. ते बाजूला करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रयत्न केले. आता त्या मोकळ्या जागेवर शैक्षणिक संकुल उभारणार आहे. वंजारी समाजाने आता संघटित होण्याची गरज आहे. समाजाने संघटित होऊन माझा फायदा करून घेतला पाहिजे. 

बेरोजगारांसाठी इंडिया बुल्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न

काही नागरिकांनी पास्तेला बारामती करण्याची मागणी केली. मात्र, उभ्या आयुष्यात बारामतीची बरोबरी आपण करू शकणार नसल्याचे सांगत सिन्नर तालुक्‍यातील बेरोजगारांसाठी इंडिया बुल्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री आव्हाड यांनी दिली. तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी कडवा धरणातील पाणी देवनदीच्या उगमात टाकल्यास पूर्व भागाला त्याचा फायदा होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

व्यासपीठावर निवृत्त पोलिस उपायुक्त डी. पी. आव्हाड, अशोक काकड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माधव आव्हाड, कचरू आव्हाड, संदीप शेळके आदी उपस्थित होते. 

मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad talked about MHADA house project at sinner Nashik marathi News