कालिकामाता यात्रोत्सवातील कोट्यवधींची उलाढाल थंडावली

विक्रांत मते
Sunday, 18 October 2020

मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून शुक्रवारपासूनच पोलिसांनी मंदिराचा ताबा घेतला. मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांची वाहने उभी होती.

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने धार्मिक स्थळे खुली करण्यास अद्याप परवानगी न दिल्याने कालिकामाता मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने कालिका यात्रोत्सवाची तब्बल दहा कोटींची उलाढाल थांबली आहे. 

कालिका यात्रोत्सवानिमित्त जुना आग्रा रोडवर गर्दी असते. कालिकामातेचे दर्शन घेतल्यानंतर भाविक आनंदमेळा व अन्य साहित्य खरेदीचा आनंद लुटतात. खाद्यपदार्थांची दुकाने व खेळण्यांची दुकाने थाटली जातात. परंतु यंदा कोरोनामुळे उत्सवावर पाणी फेरले. मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून शुक्रवारपासूनच पोलिसांनी मंदिराचा ताबा घेतला. मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांची वाहने उभी होती. मुखदर्शन घेण्यासाठीही भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या संरक्षक भिंतीवर पडदा टाकण्यात आला. यात्रेनिमित्त मनोरंजनाचे खेळ होतात. त्यातून एक ते दीड कोटींची उलाढाल होते. यंदा खेळांच्या पाळण्यावर बंदी आहे. ज्या जागेवर पाळणे रोवले जातात, त्या जागांचा लिलाव महापालिकेने काढला नाही. पोलिसांनीदेखील मोठ्या बस त्या जागेवरून हलविल्या नाहीत. खेळणी, फूल व पूजा साहित्य विक्रीतून होणारी कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalikmata Yatra Turnover of crores cooled down nashik marathi news