परवानापत्र असतानाही उन्हातान्हात अडकले महाराष्ट्राच्या सीमेवर! अन् मग...

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 एप्रिल 2020

परराज्यात महिनाभर असुविधांचा सामना केल्यावर आता गावी जायला मिळणार, या आनंदात भुकेल्या पोटी निघालेल्या मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडावे लागले. काही तासांनी मग....

मालेगाव / नांदगाव : लॉकडाउनमुळे मध्य प्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर प्रवेश मिळाला. नाशिक, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील हे मजूर असून, छिंदवाडा जिल्हाधिकाऱ्यांचे परवानापत्र असतानाही महाराष्ट्राच्या सीमेवर उन्हातान्हात कित्येक तास तिष्ठत राहावे लागले. 

परतवाडा येथे उन्हात कित्येक तासांची तिष्ठंती 
मध्य प्रदेशात साखर कारखाने व मजुरीसाठी गेलेले शेकडो मजूर महिनाभर लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. आंतरराज्यीय दळणवळणाच्या निर्बंधांमुळे त्यांना महाराष्ट्रात स्वगृही परत येणे शक्‍य होत नव्हते. जवळचे रेशन संपल्याने दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी तेथील खासदारांशी संपर्क साधून जीवनावश्‍यक वस्तू देण्याची व्यवस्था केली. सोमवारी (ता. 20) केंद्र शासनाने शिथिल केलेल्या नियमांमुळे छिंदवाडा जिल्हाधिकारी डॉ. श्रीनिवास शर्मा यांनी या मजुरांना महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी मंगळवारी (ता. 21) दिली. पत्र हातात पडल्यावर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शंभरापेक्षा अधिक ट्रॅक्‍टरवर बिऱ्हाडे लादून प्रवास सुरू केला. मात्र, उपरोक्त दोन राज्यांच्या सीमेवर परतवाडा (जि. अमरावती) येथे त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अडविले व वरिष्ठांची परवानगी आणल्याशिवाय प्रवेश करू दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

आणि त्यांनी हिरवा सिग्नल दिला

परराज्यात महिनाभर असुविधांचा सामना केल्यावर आता गावी जायला मिळणार, या आनंदात भुकेल्या पोटी निघालेल्या मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडावे लागले. काही तासांनी वरिष्ठ आले आणि त्यांनी हिरवा सिग्नल दिला. त्यानंतर मजुरांच्या ताफ्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यात नांदगाव तालुक्‍यासह जिल्ह्याच्या विविध भागांतील ऊसतोड मजुरांचाही समावेश आहे. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laborers from Madhya Pradesh return to Maharashtra nashik marathi news