Diwali Festival 2020 : सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरोघरी! सोन्‍याची खरेदी, ऑटोमोबाईल तेजीत 

अरुण मलाणी
Saturday, 14 November 2020

सोने-चांदीच्‍या दागिन्‍यांच्या खरेदीसाठी सराफी पेढ्यांत ग्राहकांची गर्दी होती. वाहन खरेदीचे नियोजन आखल्‍याने कंपन्‍यांच्‍या दालनांमध्येही ग्राहकांची वर्दळ आहे. दोन दिवसांत सोने-चांदी खरेदीचा असाच उत्‍साह कायम राहणार आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांनाही चांगली मागणी असल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे. 

नाशिक : शनिवारी (ता.१४) होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्‍या पूर्वसंध्येला खरेदीचा उत्साह शिगेला पोचला आहे. शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्‍या होत्‍या. सोनपावलांनी लक्ष्मी घरोघरी येणार असल्‍याने जय्यत तयारीवर भर बघायला मिळाला. 

लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग

संपत्ती, ऐश्‍वर्याची देवता असणाऱ्या लक्ष्मीपूजनाला दिवाळीत घरोघरी होणारे धार्मिक महत्त्व आहे. पूजेसाठी हिशेब वही, केरसुणी, देवीची मूर्ती, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्‍याच्‍या खरेदीची लगबग रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रविवार कारंजा, अशोक स्‍तंभ परिसरात तुडुंब गर्दी बघायला मिळाली. तर मेन रोड, शिवाजी रोड परिसरात नवीन कपडे, बूट व अन्‍य साहित्‍य खरेदीसाठी गर्दी बघायला मिळाली. लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग केली जात असल्‍याने गुंतवणूकदारांकडून तसेच शेअर ब्रोकिंग कंपन्‍यांकडून यासंदर्भात तयारी सुरू होती. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

सोन्‍याची खरेदी, ऑटोमोबाईल तेजीत 
सोने-चांदीच्‍या दागिन्‍यांच्या खरेदीसाठी सराफी पेढ्यांत ग्राहकांची गर्दी होती. वाहन खरेदीचे नियोजन आखल्‍याने कंपन्‍यांच्‍या दालनांमध्येही ग्राहकांची वर्दळ आहे. दोन दिवसांत सोने-चांदी खरेदीचा असाच उत्‍साह कायम राहणार आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांनाही चांगली मागणी असल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 

दुपारी दोन ते सायंकाळी पाच (लाभ-अमृत) 
सायंकाळी सहा ते साडेसात (लाभ) 
रात्री नऊ ते बारा (शुभ-अमृत)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lakshmi pujan Diwali Festival 2020 nashik marathi news