थर्टी फर्स्ट पार्श्वभूमीवर नाशिकच्या भरारी पथकाची कारवाई; आंबोली घाटात पकडली साडेपाच लाखांची दारू

liquor1.jpeg
liquor1.jpeg

नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने रविवारी (ता. २७) आंबोली घाटात पाच लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहतूक करणाऱ्या मनीष नानूभाई खेनी (रा. वराछा, गुजरात) याला ताब्यात घेतले आहे. 

आंबोली घाटात साडेपाच लाखांची दारू पकडली 
रविवारी पहाटे सापळा रचून पांढऱ्या रंगाची कार (जीजे ०५, आरजे ६२७६) अडवून तपासणी केली असता, कारच्या चोरकप्प्यात पंजाबनिर्मित व केवळ दादरा व नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेशी पकडली. त्यात ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४४ बाटल्या, वॅट ६९ स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १३ बाटल्या व ब्लॅडर प्राइड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या चार बाटल्या व कार, असा एकूण पाच लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक मनीष नानूभाई खेनी याला ताब्यात घेण्यात आले.  

उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक राजेश धनवटे, विजेंद्र चव्हाण, श्याम पानसरे, दीपक आव्हाड, गौरव तारे, विष्णू सानप, महेश सातपुते यांच्या पथकाने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com