मस्तच! चंद्राची उपमा देणाऱ्यांनो आता चंद्राचा प्रवासही करायला मिळणार; तोही कमी खर्चात

moon.gif
moon.gif

नाशिक : चंद्रावर सहा वेगवेगळे क्षेत्र केलेले असून, तेथील परिस्थितीप्रमाणे म्हणजे पाण्याची उपलब्धता, तापमान या महत्त्वाच्या गोष्टी ठरणार आहेत. उत्तर व दक्षिण ध्रुव हे त्यासाठी महत्त्वाचे आहेत. दक्षिण ध्रुवावर आपल्या चांद्रयान मोहिमेने पाण्याचा शोध घेतला. परंतु हा भाग नेहमीच काळोखात असतो. २०३० पर्यंत कमी खर्चाच्या व्यावसायिक तऱ्हेने लोअर अर्थ र्ऑर्बिटमध्ये प्रवेश करता येऊ शकतो, अशी शक्‍यता ‘नासा’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जॉन मॅनकिन्स यांनी सोमवारी (ता. ५) व्‍यक्‍त केली. 

चंद्र व मंगळावरील मानवी वस्तीच्या प्रकल्पांविषयी चर्चा

जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) च्या नाशिक इंडिया चॅप्टरतर्फे दुसऱ्या दिवशी झूम व यू-ट्यूब लाइव्हद्वारे ‘चांद्रमोहिमा-अन्वेषण-विकास आणि भविष्यातील वसाहत’ याविषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी जागतिक अंतराळ सप्ताह, नॅशनल स्पेस सोसायटी व नाशिक इंडिया चॅप्टरविषयी माहिती दिली. जॉन मॅनकिन्‍स यांनी भविष्यातील चंद्र व मंगळावरील मानवी वस्तीच्या प्रकल्पांविषयी चर्चा केली. 

‘एनएसएस नाशिक इंडिया चॅप्टर’ चॅनलवर लाइव्ह

आधीपासूनच आपण ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना राबवीत आहोत. पण या अंतराळ तंत्रज्ञानाच्या व परग्रहावर मानवी वस्ती करण्याच्या संशोधनामध्ये जागतिक स्‍तरावर जोडणी, परवडणारी ऊर्जा संसाधने, मेगावॉटमध्ये लागणारी वीज, परग्रहावर उपलब्ध असणारे संसाधन आदींचा परग्रहावर कायमच्या वस्तीसाठी संशोधन व प्रयत्नांची खूप गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मंगळवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाला अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ जोसेफ ब्लांड यांचे ‘अंतराळातून सौरऊर्जेने वीजनिर्मिती’ याविषयावर व्याख्यान यू-ट्यूबच्या ‘एनएसएस नाशिक इंडिया चॅप्टर’ चॅनलवर लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com