esakal | "महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील!"; भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

bjp woman.png

गेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत.

"महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील!"; भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचा आरोप

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक : गेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत. महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. महिलांविषयीचे कायदे अधिक कडक करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे.

अनेक घटकांपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न

पक्षाच्या वतीने आज महिला सुरक्षितता आणि राज्यातील मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले. नाशिक शहरात प्रत्येक विभागात आंदोलन करण्यात आले. धार्मिक संस्था व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले लहान व्यवसायिक, विक्रेते अशा अनेक घटकांपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

सध्याचे कायदे कडक करण्याविषयी प्रक्रीया सुरु करा

राज्य सरकारने दुकाने, संस्था सगळ्यांनाच परवानगी दिली आहे. मात्र मंदिरे व धार्मिक संस्थांना अद्याप परवानगी दिलेली नाही. हे अयोग्य आहे. त्याचा तातडीने फेरविचार करावा. मंदिरे उघडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात आज मालेगाव येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. सध्याचे कायदे कडक करण्याविषयी प्रक्रीया सुरु करावी.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा मंजुषा कजवाडकर, नगरसेविका दिपाली वारुळे, सचिव लीलाताई दिघावकर, अनिता चांडक, अनिता बाविस्कर, रेखा चौधरी, अलका हिरे, रेखा शिंदे, कांचन शिंदे, जया भुसे, विमल हिरे आदी भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.