आण्विक काळात सैन्यदल सक्षमीकरणात हवे; मेजर जनरल ओक यांची चीन,पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर टिका

major oak.jpg
major oak.jpg

नाशिक : सैन्यदलांनी काळानुरूप बदल स्विकारत अत्याधुनिकतेकडे वाटचाल केलेली आहे, त्याचे चांगले परिणाम आपल्याला आजच्या काळात दिसू लागले आहे. त्यातूनच युवापिढीचे आकर्षण वाढले असून उच्च पदावर जाण्यासही ते उत्सुक असल्याचे दिसते, पण आण्विक काळात आपला विभाग (रेजिमेंट) सैन्यदल सक्षमीकरणात प्रबळ नेतृत्व आणि अपारकष्टाची तयारी हवी, हे त्यांनी विसरू नये,असे प्रतिपादन विशेष सेवा पदक विजेते मेजर जनरल मनोज ओक यांनी केले. 

मिलीटरी लिडरशिप इन कॉन्टेम्पररी एन्वायरमेंट`विषयावर पहिले पुष्प
सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थापक धर्मवीर डॉ.बा,शि.मुंजे यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त आजपासून ऑनलाइन व्याख्यानमालेला सुरवात झाली.श्री.ओक यांनी `मिलीटरी लिडरशिप इन कॉन्टेम्पररी एन्वायरमेंट` या विषयावर पहिले पुष्प गुंफले. सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर अध्यक्षस्थानी होते. ओक यांनी डॉ.मुंजेच्या दूरदृष्टीकोनातून सैनिकी शिक्षणाची सोय म्हणून भोसला मिलीटरी स्कूल सुरु झाले. ब्रिटीश काळात त्याचे कार्य इतरांसाठी त्याचे कार्य प्रेरणादायी होते, त्यांच्याच विचाराचा वारसा संस्था पुढे नेत आहे याबद्दल आनंद व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
नेतृत्वगुण आणि रणनिती महत्वाची
सैन्य दलात नेतृत्व गुण आणि रणनिती ही महत्वाची असते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय सैन्यदलाने जगात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे असे नमूद करून ते म्हणाले,जागतिक स्तरावर राष्ट्रे आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने इतरांसमोर आव्हान निर्माण करू लागले आहे. १४ देश हे आपले सामर्थ्य वेगवेगळ्या द्वारे दाखविताना दिसतात. त्यात रशिया,चीन,ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल, पाकिस्तान, कोरीया सारखे देश पुढे आहे. इराण सारखा देश तर सेटेलाईट कंट्रोलसह ड्रोन वापर इतर बाबींना प्राधान्य देत आपले साम्राज्य उभे करू लागला आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
भारताची शौर्यगाथा प्रेरणादायीच
पुलवामा,बालाकोट,उरी,पठाणकोटसारख्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्यदलाने आपली ताकद दाखवत इतरांना पळता भूई थोडी केली आहे. तीन दशकापांसून उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य पध्दतीने वापर करत मिळवलेले यश हे निश्चित प्रेरणादायी म्हणता येईल,आज तर चांगल्या नेतृत्वामुळे व भरपूर आर्थिक तरतूदीमुळे सैन्यदल सक्षमीकरण झाले आहे, त्यामुळे आपले सैनिक नव्या दमाने कुणाशीही आणि कधीही युध्द करू शकतात.

आण्विक युध्द आणि काश्मीर प्रश्न
नेतृत्वक्षमता चांगली असेल तर सैन्यदल अधिक जोमाने काम करू शकते, हे सांगतांना श्री.ओक यांनी आपल्या काळातील काही उदाहरणे दिली. पुढील काळात सोशिओ एकोनॉमिकचे आणि अदृश्य पणे हल्ला करणाऱ्या सैनिकांशी मुकाबला करण्याचे आव्हान आपल्या सैनिकांसमोर आहे, पण योग्य नेतृत्व व सक्षमीकरणामुळे त्यावरही मात करतील. आण्विक शस्त्रांचा धाक दाखवत काही देश घाबरवत आहे. पण आपले सैनिक डगमगणारे नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे, अध्यक्ष लेप्टनंट जनरल शेकटकर यांनी समाजाची एकत्रिकरणाची भावना निर्माण करून वसुधैव कुटुंबकम ची संकल्पना मांडली, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com