कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या पुढे...अन् मुख्याधिकाऱ्याविनाच मनमाड पालिकेचा गाडा!

download.jpg
download.jpg

नाशिक / मनमाड ः मनमाड शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या पुढे गेल्याने मनमाडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना पालिकेला मात्र मुख्याधिकारी नसल्याने रखडलेल्या कामकाजाविरोधात विविध पक्ष-संघटना सरसावल्या आहेत. 

या सगळ्या स्थितीत मुख्याधिकारी मात्र नाहीत. 

 मनमाड शहरात एकूण १०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दोन रुग्ण  नाशिकला उपचार घेत असून, गुरुवारी (ता. ९) १३ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे यातील एकूण ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील २१ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनीही हलगर्जी न करता स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, काम नसताना गावात फिरणे, मास्क न वापरणे यामुळेदेखील संसर्ग वाढत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता असताना, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्यापारी महासंघाने पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू केला आहे. या सगळ्या स्थितीत मुख्याधिकारी मात्र नाहीत. 

मनमाड शहरात कोरोनाचे संकट गडद

मनमाड शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांची तडकाफडकी बदली झाल्याने, मुख्याधिकारीच नाही. त्यामुळे कामकाज थांबले आहे. प्रशासकीय कामात विस्कळितपणा आला आहे. शहराला सक्षम मुख्याधिकारी लवकरात लवकर देण्याची गरज आहे. -गंगादादा त्रिभुवन, जिल्हा कार्याध्यक्ष, रिपाइं 


कोरोना पॉझिटिव्ह १०६ 
बाधितांचा मृत्यू ०६ 
उपचार घेणारे ३७ 
होम क्वारंटाइन ०८ 
कोरोनावर मात ५९  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com