दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल

अंबादास शिंदे
Friday, 9 October 2020

पुजा हिचा विवाह महेश दशरथ नेहे यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ ला झाला होता. तेव्हापासून पती महेश पूजा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करत होता. पण त्यानंतर आणखी छळ वाढू लागला.

नाशिक रोड  : पुजा हिचा विवाह महेश दशरथ नेहे यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ ला झाला होता. तेव्हापासून पती महेश पूजा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करत होता. पण त्यानंतर आणखी छळ वाढू लागला.

असा घडला प्रकार

जेल रोडवरील शिवाजीनगर येथील विवाहितेचा दहा लाखांसाठी छळ केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पूजा नेहे (शिवाजीनगर, जेल रोड) यांनी पती महेश, सासू कल्पना नेहे, सासर दशरथ नेहे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह महेश दशरथ नेहे यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ ला झाला होता. तेव्हापासून पती महेश पूजा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करत होता. लग्नाच्या वेळी दोन लाख रुपये हुंडा दिला होता. त्यानंतर सासरचे लोक घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास देत होते. स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून, तसेच लग्नात काहीच दिले नाही, असे म्हणून त्रास देत होते. ९ जुलैला पती महेशने पूजाला मारहाण करून माहेरी रस्त्यावर मुलासह सोडून दिले.  

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marital harassment for ten lakhs nashik marathi news