लग्नात मानपान, सात लाख रुपयांच्या सतत मागणीने विवाहिता हतबल; अखेर उचलले असे पाऊल की..

married woman 123.jpg
married woman 123.jpg

नाशिक : लग्नात मानपान, दागिने व इतर वस्तू दिल्या नाहीत. पतीला हॉटेल व्यवसायासाठी पैसे माहेरहून आणावेत, अशी सतत मागणी सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेकडे होत असे. त्यासाठी तिला वारंवार बोलणी तसेच शिवीगाळ ऐकावी लागत असे. हतबल झालेल्या विवाहितेने मात्र यानंतर असे पाऊल उचलले. ही घटना नाशिकच्या अस्मित हाईट्स, अशोकामार्ग येथे घडली.

सतत होणाऱ्या गोष्टींमुळे विवाहितेने अखेर एक दिवस पाऊल उचललेच..

नेहमीप्रमाणे लग्नात मानपान, दागिने व इतर वस्तू दिल्या नाहीत. तसेच पतीला हॉटेल व्यवसायासाठी ७ लाख रूपये माहेरहून आणावेत, अशी मागणी सासरच्यांनी विवाहितेकडे केली. त्यानंतर विवाहितेनी त्यास नकार दिला.  विवाहितेनी नकार दिला म्हणून सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच धक्कादायक बाब म्हणजे सासरच्या एकाने तिचा विनयभंग करत शिवीगाळही केली. अखेर सतत होणाऱ्या या गोष्टींमुळे विवाहितेने अखेर एक दिवस पाऊल उचललेच..

सासरच्या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित विवाहितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती तुषार सुधाकर दुसाने (३१, रा.अस्मित हाईट्स, मुंबई नाका) याच्यासह सासरच्या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करत आहेत.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com