VIDEO : शहीद मनोराज सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sonawane.jpg
sonawane.jpg

नाशिक : (मालेगाव) मावळत्या सुर्याच्या साक्षीने, हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत माणके येथील जवान मनोराज सोनवणे यांच्यावर 'अमर रहे, अमर रहे'च्या जयघोषात शनिवार (ता. 31) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

१६ वर्षांपासून भारतीय लष्कर सेवेत कार्यरत

भारतीय सैन्य दलातील पॅरा फोर्स कमांडर म्हणून सेवेत कार्यरत असलेले मनोराज शिवाजी सोनवणे हे गेल्या १६ वर्षांपासून भारतीय लष्कर सेवेत कार्यरत होते. अरूणाचल प्रदेशात लष्करी सेवा बजावत असतांना प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकता येथील लष्करी रूग्णालय भरती करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान शुक्रवारी (ता. ३०) रोजी पहाटे १.३० रोजी निधन झाले. माणके येथील शेतकरी कुटुंबातील मनोराज सोनवणे २००५ मध्ये भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. तर २००९ मध्ये २१ पॅरा कमांडोमध्ये सेवा देत होते. 

त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे (६), मुलगी तनू सोनवणे (३) असा परिवार आहे. कोलकता येथून सोनवणे यांचे पार्थिव विमाने मुंबई येथे आणण्यात आले. तेथून मालेगाव तालुक्यातील माणके या मुळगावी लष्करी इतमामात त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आले. सोनवणे यांना मुलगा तुषारने अग्नीडाग दिला.

यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अविनाश रसाळ, तहसिलदार चंद्रजीत राजपुत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com