ह्रदयद्रावक! 'तिने' रस्त्त्यात बाळाला जन्मही दिला..अन् दीड तासाने 1100 किमी दूर गावी जाण्यासाठी चालत निघाली सुध्दा.....

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सरकारकडून लोकांची काळजी घेतली जात असली तरी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला आहे. यात मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांसाठी गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

नाशिक : औरंगाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर मजुरांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव होत आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून मध्यप्रदेशातील सतना हे 1100 किमी अंतर चालताना पिंपळगाव इथं एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. अन् पुढे जे काही झाले ते ह्रदय पिळवटून टाकणारे होते.

तिला रस्त्त्यातच प्रसुतीवेदना सुरू झाल्या..अन् मग...

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सरकारकडून लोकांची काळजी घेतली जात असली तरी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला आहे. यात मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांसाठी गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. नाशिकमधून मध्यप्रदेशातील सतना हे 1100 किमी अंतर चालताना पिंपळगाव इथं एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि महिलेनं रस्त्यातच मुलाला जन्म दिला. एवढंच नाही तर त्यानंतर दीड तासात महिलेनं पुन्हा चालायला सुरुवात केली. सेंधवा सीमेवर पोलिसांनी त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये नेलं आहे

पतीने सांगितले की...

महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली त्याबद्दल पतीने सांगितलं की, तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तेव्हा महिलांनी पडदा धरून तीची प्रसूती केली.  त्यानंतर दीड तासाने आम्ही पुन्हा चालत निघालो.घरी परत जाणाऱ्या या कामगारांपैकी आणखी एकाची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. तीसुद्धा नाशिकपासून चालत निघाली आहे. खायला काहीच नाही आणि खर्चाला पैसे नसल्यानं चालत गावी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मजुरांनी सांगितलं.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

जेव्हा पोलिसांना पाहिलं तेव्हा ते पळून जात होते. शेवटी त्यांना समजावून सांगितलं

जवळपास 15 ते 16 मजूर आहेत. त्यांच्यासोबत 8-10 लहान मुलं आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या या लोकांमध्ये एका महिलेची प्रसुती नाशिक ते धुळे यादरम्यान झाली. महिलांनी रस्त्यावरच प्रसूती केली. त्यानंत पुन्हा ते चालत निघाले. जेव्हा पोलिसांना पाहिलं तेव्हा ते पळून जात होते. शेवटी त्यांना समजावून सांगितलं आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांना पोहोचवण्यासाठी बसची व्यवस्था केली जात आहे. याबाबत असे सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी व्हीडीएस परिहार यांनी सांगितले

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migrant workers woman walk after delivery nashik marathi news