भात नुकसान पाहणीसाठी चिखल तुडवत आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

mla nitin pawar
mla nitin pawar

नाशिक/पळसन : तालुक्यात नवरात्रीदरम्यानच्या मुसळधार पावसामुळे भातशेती भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी शुक्रवारी (ता. २३) तालुक्यातील विविध भागांतून नुकसानग्रस्त पीक पाहणी दौरा करत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे भात, नागली, वरई या पिकांचे नुकसान होऊन असंख्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील शेतकरी हा कोरडवाहू खरीप शेतीवर अवलंबून आहेत. वर्षभरात एकच पीक घेतले जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या वेळी हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कोलमडला असून, झालेल्या संपूर्ण खर्चाची नुकसानभरपाई शासनाने देण्याची मागणी होत आहे. श्री. पवार यांनी तालुक्यातील हट्टी, शिवपाडा, करवंदे, दुर्गापूर, तळपाडा, चिलारपाडा, वरसवाडी, वडपाडा आदी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com