संशयित आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला; लाखाचा ऐवज लंपास

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Sunday, 20 September 2020

सुंदरनगरमध्ये १३ जूनला रात्री दीडच्या सुमारास दहा-पंधरा मुलांच्या टोळक्याने रहिवाशांची घरे, खिडक्यांवर लाकडी दांडके, कोयते, सळ्या मारून नुकसान केले होते. तसेच वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती. हल्लेखोरांमध्ये वाल्मीक यांचा मुलगा जय ऊर्फ मारुती घोरपडे होता.

नाशिक : (नाशिक रोड) वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील संशयिताच्या घरावरच अज्ञातांनी हल्ला करून नुकसान केले असून, घरातील एक लाखाचा ऐवज चोरून नेला. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

लाखाचा ऐवज लंपास

वाल्मीक सुखदेव घोरपडे (सुंदरनगर, देवळालीगाव) यांच्या तक्रारीनुसार, सुंदरनगरमध्ये १३ जूनला रात्री दीडच्या सुमारास दहा-पंधरा मुलांच्या टोळक्याने रहिवाशांची घरे, खिडक्यांवर लाकडी दांडके, कोयते, सळ्या मारून नुकसान केले होते. तसेच वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती. हल्लेखोरांमध्ये वाल्मीक यांचा मुलगा जय ऊर्फ मारुती घोरपडे होता. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वाल्मीक घोरपडे, मंगल घोरपडे, जय ऊर्फ मारुती घोरपडे यांना पोलिसांनी अटक केली होती. तोडफोडीचा राग मनात धरून काही जणांनी घोरपडे यांच्या घराच्या भिंती, दरवाज्या, खिडक्या यांची तोडफोड केली. दोन कपाटे, फ्रीज, टीव्ही, दोन गॅस सिलिंडर, दोन शेगड्या, कुलर, भांडीकुडी, घोडे सजविण्याचे सामान, अडीच तोळ्याचा सोन्याचा वेल, बांगड्या, डोरले असा सुमार एक लाखांचा एवजही चोरून नेला.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mob attack on suspects' home, Theft of lakhs was stolen nashik marathi news