संतापजनक! भाच्याचे भांडण बघायला थांबली महिला...संशयिताने भर रागात महिलेसोबत केले असे

woman on scooty.jpg
woman on scooty.jpg

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवघेण्या या व्हायरसशी सगळेच लढा देत आहेत. अशातच नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. काही संशयित भाच्याशी भांडण करीत होते. त्यावेळी पीडित महिला थांबल्या असता त्यांच्यासोबत संतापजनक प्रकार घडला आहे.

असा घडला प्रकार

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गेल्या मंगळवारी (ता. 26) दुपारी चारच्या सुमारास त्या मुलासह ऍक्‍टिवावरून सिन्नर फाटा येथे जात होत्या. त्यावेळी सिन्नर फाटा येथे त्यांच्या भाच्याशी संशयित भांडण करीत होते. त्यावेळी पीडित महिला थांबल्या असता, संशयित हुसेन फिरोज शेख याने पीडितेचे केस धरून आपटले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच, संशयितांनी महिलेवर रस्त्यावर पाडून शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला सहाय्यक निरीक्षक एम.बी. राऊत या तपास करीत आहेत.

चौघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथे महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकबाल शेरू शेख, हुसेन फिरोज शेख, अश्‍पाक शेख, अक्षय धुमाळ (रा सर्व रा. सिन्नरफाटा परिसर) असे संशयितांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com