पती व मुलाला "तिचे"अनैतिक संबंध समजले ...शेवटी मुलानेच..

mother affair.jpg
mother affair.jpg
Updated on

नाशिक : संविधाननगर, भायगाव शिवारातील ज्योती डोंगरे (वय 36) या महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला नऊ दिवसांनंतर यश आले. संबंधित महिलेच्या जाचाला कंटाळून तिचा सावत्र मुलगा मनोज डोंगरे (वय 28, रा. संकल्पनगर) यानेच सुपारी देऊन मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे उघड झाले. 

असा घडला प्रकार...

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अनैतिक संबंध, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची शक्‍यता बळावली. ज्योतीचा सावत्र मुलगा मनोज व शिक्षक पती भटू डोंगरे यांना तिचे अनैतिक संबंध असल्याचे माहीत होते, तसेच तिची पतीची मालमत्ता व पगारावर नजर होती. नाशिकला फ्लॅट घेण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणी करून ती पतीला त्रास देत होती. या सर्वांचा मनोजला राग आला होता. त्यामुळे त्याने प्रकाश निकम ऊर्फ पका (34, साने गुरुजीनगर), जितेंद्र कास ऊर्फ जितू राजपूत (40, मुक्ताई कॉलनी), रवींद्र अहिरे (27, इंदिरानगर, चंदनपुरी), रवी पावरा (30, धुळे), सरदार पावरा (40, रा. आंबे, ता. शिरपूर) व सागर रंगारी (27, मोतीबाग नाका) या मित्रांच्या मदतीने खुनाचा कट रचला. जितू व प्रकाश यांनी स्कॉर्पिओने संविधाननगर परिसरात शाळेजवळ गाडी उभी करून गोळ्या झाडून खून केला. भिंतीवरून उड्या टाकून दोघे फरारी झाले. सागरने रवी अहिरेच्या सांगण्यावरून रवी व संजय पावरा यांच्याकडील गावठी कट्टा आणून दिला. गावठी कट्टा व गोळ्यांसाठी 25 हजार रुपये देण्यात आले. खुनासाठी तीन लाखांची सुपारी देण्यात आली होती. यातील रवी व सागर हे पोलिसपुत्र आहेत. पोलिस निरीक्षक पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, संदीप दुनगहू, जमादार सुनील अहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, पोलिस नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीश आव्हाड, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, संदीप लगड आदींच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणी वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात खून व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

दोघा पोलिसपुत्रांचा समावेश

पोलिसांनी मनोजसह सात जणांना अटक केली. संशयितांमध्ये दोघा पोलिसपुत्रांचा समावेश आहे. गेल्या 16 जानेवारीला हा खून झाला होता. पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी या प्रकरणी समांतर तपास सुरू केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com