नाशिकचे तापमान ११.८, तर निफाडमध्ये ८.५ अंश! आरोग्यतज्ज्ञांनी दिला असा सल्ला

nashik cold123.jpg
nashik cold123.jpg

नाशिक : नाशिकचा पारा चार दिवसांनंतर पुन्हा घसरला आहे. नाशिकमध्ये आज मंगळवारी (ता. २९) किमान तापमान ११.८, तर निफाडमध्ये ८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. किमान तापमानात घसरण झाल्याने शहर आणि जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. गारठ्यात वाढ झाल्याने सायंकाळनंतर उबदार कपडे परिधान करण्याकडे कल वाढला होता. 
अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेली द्राक्षे सांभाळण्याचे कौशल्य शेतकऱ्यांनी पणाला लावले आहे. अशातच, गारठ्यात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणींत भर पडली आहे.

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला

त्याचबरोबर किमान आणि कमाल तापमान यात मोठा फरक असल्याने शारीरिक समस्यांमध्ये भर पडणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूच्या झालेल्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्दी, खोकला, ताप या समस्यांना सामोरे जाऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विशेषतः आवश्‍यकता असल्यास घराबाहेर पडावे. अशा वेळी उबदार कपडे परिधान करावेत. गरम पाणी पिण्यासह आहारात गरम खाद्यपदार्थांचा समावेश करावा. थंड पेय अथवा खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

आठवड्याभरापूर्वी गारठा वाढला 
नाशिकमध्ये १९ डिसेंबरला किमान तापमानाची नोंद १४.२ अंश सेल्सिअस इतकी झाली होती. दुसऱ्या दिवशी दोन अंश सेल्सिअसने किमान तापमान घसरले. २१ डिसेंबरला ९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असताना गारठा वाढला होता. त्यानंतर चार दिवस हवेत गारवा राहिला होता. २२ डिसेंबरला ८.४ अंश सेल्सिअस, तर २३ डिसेंबरला सर्वांत कमी म्हणजेच ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते. २४ डिसेंबरला एक अंश सेल्सिअसची वाढ होऊन ९.२ अंश सेल्सिअस तापमान राहिले होते. त्यानंतर मात्र किमान तापमान वाढत गेले. २५ डिसेंबरला १३, २६ डिसेंबरला १४.६, रविवारी (ता. २७) १४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com