नाशिकच्‍या कलावंतांकडून सुशांतसिंगला अनोखी श्रद्धांजली...पाच दिवसांत चक्क 'इतके' व्ह्यूज

प्रशांत कोतकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सुशांतच्या अभिनयाने आणि जगण्याने अनेकांच्या जीवनास आनंदाचा स्पर्श केला. केवळ अभिनय आणि अभिनेता म्हणून चाहत्यांपुढे सादर न करता त्याच्या आयुष्याचा एक भाग आहोत म्हणूनही त्याच्याविषयी  उत्कटता व्यक्त करण्यासाठी ही निर्मिती केली असल्‍याचे नमूद केले आहे.

नाशिक : एसडीएस-९ एंटरटेन्मेंट कंपनीतर्फे दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यास अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. त्‍याला मानवंदना देण्यासाठी यू-ट्यूबवर अपलोड केलेल्‍या व्‍हिडिओला अवघ्या पाच दिवसांत अकरा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. विशेष म्‍हणजे या व्‍हिडिओच्‍या निर्मितीत नाशिकचे कलावंत इंद्रजित पवार यांचा सहभाग आहे. 

गाण्यातून सुशांतला श्रद्धांजली

या गुणसंपन्न अभिनेत्यासाठी एसडीएस ९ इंटरटेन्मेंट कंपनीने जड अंतकरणाने भावनाप्रधान गाण्यातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्याची संकल्पना व्यक्त केली. सुशांतच्या अभिनयाने आणि जगण्याने अनेकांच्या जीवनास आनंदाचा स्पर्श केला. केवळ अभिनय आणि अभिनेता म्हणून चाहत्यांपुढे सादर न करता त्याच्या आयुष्याचा एक भाग आहोत म्हणूनही त्याच्याविषयी  उत्कटता व्यक्त करण्यासाठी ही निर्मिती केली असल्‍याचे नमूद केले आहे. कंपनीच्‍या लेखक, गीतकार, संगीत दिगदर्शक, गायक अशा टीमने एकत्र येत सुशांतच्या आत्म्याला असीम  शांती मिळवून देणारी श्रद्धांजली गीते समर्पित केली आहेत. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

कंपनीचे संचालक राजेश्वर मांडे हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. इंद्रजित पवार यांनी टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध मालिकेत वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांच्या एक्टर प्रिपेयर या ॲकॅडमीत अभिनयाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण करून चित्रपट मालिका आणि अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या विभागाचे प्रशिक्षण घेण्यात इंद्रजित पवार यांना विशेष रुची आहे. सध्या एस डी एस ९ प्रोडक्शनसाठी इंद्रजित सज्ज आहे. आगामी चित्रपट तसेच  हिंदी अल्बमसाठी त्याची तयारी सुरू आहे. नाशिकचे नाव चित्रपटसृष्टीत अधोरेखित करण्यासाठी इंद्रजित पवारचे प्रयत्न सुरू आहेत. 

अशी आहे टीम 

या गाण्यासाठी सुनीता मांडे यांनी निर्माता, राजेश्र्वर मांडे यांनी दिग्‍दर्शक, सौरभ पातरूडकर गीतरचनाकार, आनंद मेनन यांनी संगीत दिग्‍दर्शक व गायक, संदीप यादव यांनी छायाचित्रण  तर वेदा जोशी यांनी निर्मिती विभागात काम पाहिले आहे. इंद्रजित पवार यांनी कार्यकारी निर्माता म्‍हणून जबाबदारी सांभाळली.  

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Nashik artists A unique tribute to Sushant Singh Rajput nashik marathi news