esakal | अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्र अंतिम टप्प्यात! एमपीएससीकडून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची दखल 
sakal

बोलून बातमी शोधा

eng. exam.jpg

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी मात्र नाशिक येथे केंद्र नाही. त्यामुळे अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्रासाठी काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पुढील वर्षांपासून नाशिक येथे केंद्र सुरू होणार आहे. 

अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्र अंतिम टप्प्यात! एमपीएससीकडून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची दखल 

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी मात्र नाशिक येथे केंद्र नाही. त्यामुळे अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्रासाठी काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी पुढील वर्षांपासून नाशिक येथे केंद्र सुरू होणार आहे. 

एमपीएससीकडून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची दखल 


महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत खासदार गोडसे यांनी परीक्षेसाठी नाशिक केंद्र व्हावे, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भेट घेत नाशिक केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा केंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पुढील परीक्षेपासून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक येथे केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसे पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले आहे. नाशिक केंद्रामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज


परीक्षा स्थगित 
लोकसेवा आयोगाची १ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पुढील नियोजनात परीक्षा केंद्राच्या यादीत मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांच्यासह नाशिकचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट